How to crack SSC JE: स्पर्धात्मक परीक्षेच्या या युगात, विद्यार्थी त्यांच्या परीक्षेचा अभ्यास कसे करू शकतात हे समजून घेण्यात गुंतलेले आहेत. स्वतंत्र कोचिंग शिकवणी घेऊन अनेक विद्यार्थ मुले परीक्षा उतीर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, पालकांचे बरेच पैसे वाया जातात. काही विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी काय करावे, स्वत:मध्ये कशी सुधारणा करावी याचा विचार करतात आणि यशस्वी होण्यासाठी शिक्षकांकडे टिप्सही मागतात. काही आळशी विद्यार्थ्यी मात्र शॉर्ट-कट शोधत असतात ज्यांना फार कष्ट न घेता, अभ्यास न करता परीक्षा पास करायची असते. अशा आळशी विद्यार्थ्यांसाठी एका शिक्षिकेने हटके ट्रिक सांगितली आहे. शिक्षिकेची ही ट्रिक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
यामध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ऑनलाइन क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने महिला शिक्षकांना एसएससी-जेई परीक्षेचा अभ्यास केल्याशिवाय कशी पास करावी असे विचारले? त्यावर उत्तर देताना शिक्षिकेने सांगितले की,”खूप सोपे आहे.” अभ्यास न करता एसएससी जेई परीक्षेत पास होण्याचे दोन मार्ग आहेत. यानंतर ती पहिली पद्धत सांगते, “यासाठी, ती डिजिटल बोर्डवरील मोठ्या अक्षरांमध्ये एसएससी-जेई असे लिहिते आणि नंतर ती पुसून टाकते आणि म्हणते की हा पहिला. हा पहिला मार्ग आहे. यानंतर, ती आणखी एक मार्ग सुचवते, एसी चालवा, एक चांगले ब्लँकेट घ्या आणि चांगल्या गादीवर झोपा, चांगली झोप घ्या जेणेकरून आपल्याला चांगली स्वप्ने पडतील आणि स्वप्नात ही परीक्षा पास करू शकता. यानंतर ती हसत हसते आणि विचारते अजूनही काही विचारायचे आहे.”
हेही वाचा – Video : “गं तुझं टपोरं डोलं जसं कोळयाच जालं…”; मनीमाऊचा मराठमोळा साज शृंगार बघाच, पाहताक्षणी पडाल प्रेमात!
हेही वाचा – सुधा मूर्तींच्या प्रेमात एकेकाळी नारायण मूर्ती यांनी ११ तास केला होता विना तिकीट रेल्वे प्रवास; वाचा, मजेशीर किस्सा
कोणत्याच परीक्षेमध्ये अभ्यास न करता, कष्ट न करता यश मिळवता येत नाही. अनेकदा विद्यार्थी पास होण्यासाठी शॉर्ट-कट मार्ग शोध असतात. अशा विद्यार्थ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. शिक्षिकेने आळशी विद्यार्थ्यांना ट्रोल केले आहे. हा व्हिडिओ एक्स वर @ikpsgill1 द्वारे पोस्ट केला गेला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, “अभ्यास न करता परीक्षा कशी पास करावी”. या पोस्टला आतापर्यंत २ लाख ९२ हजार व्ह्यूज मिळाले आहेत आणि पाच हजाराहून अधिक लाईक केले आहे. व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “पहिला मार्ग हा सर्वात चांगला मार्ग आहे,” दुसरा म्हणाला- “हे आहे रहस्य”. तिसरा म्हणाला, “दुसरा पर्याय उत्तम आहे”.