Viral Video : सोशल मीडियावर अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची क्रिएटिव्हीटी सादर करताना दिसतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने अंकांपासून मांजरीचे चित्र काढले आहे. तुम्हाला वाटेल कसं शक्य आहे? पण खरंय. फक्त चार वेळा इंग्रजीत पाच लिहिलेय आणि सुंदर मांजरीचे चित्र रेखाटले आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना बालपणीची आठवण येऊ शकते.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका गॅरेजमध्ये धूळ साचलेली चारचाकी उभी दिसत आहे. या गाडीच्या मागच्या काचवर प्रचंड धूळ असते. ही धूळ पाहून एक माणूस बोटाने त्यावर चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. तो सुरुवातीला चार वेळा इंग्रजीत पाच लिहितो आणि क्षणभरात सुंदर मांजर काढतो. या माणसाची ही कला पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ही सुंदर मांजर पाहून तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की चार वेळा इंग्रजीतील पाच या अंकापासून काढली आहे.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की भारतात टॅलेंटची कुठेच कमतरता नाही. काही लोकांनी कदाचित लहानपणी असे वेगवेगळ्या अंकांपासून चित्र काढले असावेत.
हेही वाचा : “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल” गाणं गुजरातीमध्ये ऐकलं का? व्हायरल VIDEO एकदा पाहाच
Tips & Tricks या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “5555 वापरून मांजरीचे चित्र कसे काढावे? हा व्हिडीओ १.५ मिलिअन लोकांनी पाहिला असून अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “हे फक्त भारतात होऊ शकतं” तर एका युजरने लिहिलेय, “मस्त.. इतकं सुंदर कोणी कसं बनवू शकतं” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून हजारो लोकांना हा व्हिडीओ लाइक केला आहे.