Viral Video : भुईमुगाच्या शेंगा हाताने फोडणे, मोठे कष्टाचे, खर्चाचे आणि वेळखाऊ काम आहे. अनेकदा भुईमुगाच्या शेंगा फोडण्याकरीता मजुर ठेवले जातात किंवा नवनवीन उपकरणाद्वारे शेंगा फोडल्या जातात पण आज आम्ही तुम्हाला एक अनोखा जुगाड सांगणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही क्षणात भुईमुगाच्या शेंगा फोडू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कपड्यांना लावायचा चिमटा उलटा पकडला आहे. या लहान चिमट्याने भुईमुंगाच्या शेंगा सहज फोडल्या जात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे भुईमुंगाची शेंग जर त्या चिमट्यात ठेवली आणि चिमटा दाबला की आपोआप शेंग फुटते आणि शेंगदाणे बाहेर पडतात. हा हटके जुगाड पाहून कोणीही थक्क होईल.
हेही वाचा : VIDEO : शेतकऱ्याची पोर! वडील देताहेत चिमुकलीला शेत नांगरण्याची ट्रेनिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ
beautiffulgram_to या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप चांगली कल्पना आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भुईमुगाच्या शेंगा फोडण्यासाठी तुम्ही जर हा अनोखा जुगाड करत असाल तर तुमचे काम क्षणार्धात होईल आणि तुमचा वेळा आणि पैसा दोन्ही खर्च होणार नाही.