How To Get A Job At Apple Tells Tim Cook: Apple, गूगल, फेसबुक, अशा काही मोठ्या संस्थांमध्ये नोकरीची संधी हे अनेकांचे स्वप्न असते. लाखो लोकं यासाठी प्रयत्न करत असतात, मुलाखतीच्या संधी शोधत असतात. पण नेमकी ही संधी कशी मिळवायची याचं उत्तर आता स्वतः Apple चे सीईओ टिम कुक यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान दिले आहे. गायक-गीतकार दुआ लीपाने आयोजित केलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत कुक यांनी Apple मध्ये नोकरीची संधी मिळवण्यासाठी पात्र उमेदवारांमध्ये कोणते गुण असायला हवेत हे सांगितले आहे.

ऍपल कर्मचार्‍यांमध्ये काय साम्य आहे याबद्दल बोलताना कुक म्हणाले की “एक + एक = तीन” असा त्यांचा सर्वांचा विश्वास आहे. तुमच्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी पुढे येण्यासाठी त्याच पद्धतीच्या टीम सदस्यांसह काम करण्याची तयारी असायला हवी. तुमची एखादी कल्पना व माझी एखादी कल्पना ही एकत्रित असल्यास कोणाच्याही एकट्याच्या कल्पनांपेक्षा चांगली असू शकते. याशिवाय एक गुण प्रत्येकामध्ये असायलाच हवा तो म्हणजे मदत करण्याची वृत्ती. टीम चे सदस्य म्हणून ते अन्य सदस्यांना खरोखरच मदत करू शकतात का किंवा इच्छितात का हे महत्त्वाचे असते.

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Self Awareness and Self Acceptance are very important steps to succeed in any interview
पहिले पाऊल: मुलाखतीला सामोरे जाताना
Job
Job Application : “काम कब करेगा?”, बॉसने गिटार वाजवतो, मॅरेथॉनमध्ये धावतो म्हणून नाकारली नोकरी; COOची पोस्ट चर्चेत
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Laurene Powell Jobs in Mahakumbh
Laurene Powell Jobs: स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांना काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग शिवू दिले नाही; कारण काय?
Image Of Tim Cook Apple CEO
Apple CEO Salary : टिम कूक यांच्या पगारात घसघशीत वाढ, २०२४ मध्ये अ‍ॅपल कंपनीकडून मिळाले ६४३ कोटी रुपये

ऍपलसह काम करण्यासाठी कोणती पदवी किंवा कोडिंग येणे आवश्यक आहे का याविषयी माहिती देताना कुक यांनी सांगितले की, “आम्ही ‘सर्व क्षेत्रातील’ लोकांना कामावर घेतले आहे, त्यात महाविद्यालयीन पदवी, पदव्युत्तर पदवी नसलेल्या लोकांचाही समावेश आहे. कोडिंग हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे कौशल्य असले तरी ऍपलने अशाही व्यक्तींना कामावर घेतले आहे ज्यांच्याकडे कोडिंगचे कौशल्य नाही किंवा ते त्यांच्या दैनंदिन कामात नियमितपणे कोडिंगचा वापर करत नाहीत.

हे ही वाचा<<भारतात पहिली वहिली ड्रायव्हरलेस टॅक्सी सेवा? Video पाहून नेटकरी झाले थक्क, पण महिलेने शेअर केलेला अनुभव..

थोडक्यात सांगायचे तर, कूक यांच्या माहितीनुसार ऍपलमध्ये काम करणारी व्यक्ती ही जिज्ञासू हवी, जे प्रश्न विचारण्यास घाबरत नाहीत. सर्जनशीलता आणि टीमचा भाग म्हणून काम करू शकणाऱ्या व्यक्तीला नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते.

Story img Loader