Shocking video: ‘एक पावभाजी बटर मारके’ असं आपण अनेकदा सांगतो. पण, हे बटर बनावट असेल तर? म्हणजे तुम्ही जे बटर खाताय, ते कशापासून बनवलं आहे, याचा केव्हा विचार केलाय? केवळ ब्रॅडच्या नावाखाली तुमच्या ताटात किंवा तुम्हाला बनावट अमूल बटर तर विकलं जात नाही ना? याचा केव्हा विचार केलाय? लोणी शरीरासाठी आरोग्यवर्धक मानलं जातं. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडनं लोण्याची विक्री केली जाते. पण तुम्हाला माहितीये का? हेच लोणी तुमच्या जिवावरही बेतू शकतं. कारण बाजारात नकली लोण्याची सर्रास विक्री सुरूंय. विश्वास बसत नाही मग हा सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहाल तर पायाखालची जमीन सरकेल. आता अमुल बटरमध्ये देखील डुप्लीकेट प्रोडक्ट आले आहेत. या व्हिडीओमध्ये दाखवलं गेलंय ओरिज्नल आणि डुप्लीकेट अमुल बटरमधील फरक कसा ओळखायचा? हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा आणि बघा तुम्ही तर बनावट, भेसळयुक्त डुप्लीकेट बटर खात नाही ना.

व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार या डुप्लीकेट बटरचं पॅकिंग हुबेहुब खऱ्या अमुल बटर सारखं करण्याचा प्रयत्न केलाय. पण जर तुम्ही दोन्ही पॅकेट निरखून पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल पॅकेटवर जो हिरव्या रंगाचा डॉट आहे त्याच्या शेजारी जास्त जागा सोडण्यात आली आहे. पण ओरिज्नलमध्ये ही जागा कमी आहे. त्यानंतर पाठीमागे जो अमुलचा लोगो आहे त्यामध्ये सुद्धा फरक आहे. यावरून तुम्ही खरं आणि खोटं पॅकेट ओळखू शकता. तसंच डुप्लीकेट लोणी हे पाम तेल आणि दूधाला मिक्स करून तयार केलं जातं. त्यामुळे चवीमध्ये सुद्दा तुम्हाला फरक जाणवेल. हे अशाप्रकारे फसवणूक करतात की ते आपल्या लवकर लक्षातही येणार नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO

स्वादिष्ट जेवणासाठी गृहिणी हमाखास लोण्याचा उपयोग करतात. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा आवडता नाश्ता म्हणजे ब्रेड आणि बटर. पण जरा थांबा. हेच लोणी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. बनावट लोण्यामुळे आजारांचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे हानीकारक लोणी खाल्ल्यानं डायबिटीजसारखे आजार बळावतायेत.बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ constellaplay नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अजून किती लोकांच्या जीवावर उठणार?” तर आणखी एकानं “हे सगळं कधी बंद होणार काय माहिती की आता काय हे जीव घेणार का” असा सवाल केलाय.

Story img Loader