How to make Mango Pani Puri: आंब्याची चव कोणाला आकर्षित करत नाही? उन्हाळ्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्याचा हंगाम अजून पूर्णपणे आलेला नाही, पण बाजार आणि दुकानांमध्ये आंबा पाहायला मिळत आहे, हौशी लोक उत्साहाने खरेदी करत आहेत. आतापर्यंत आपण आंब्यापासून ज्यूस, लस्सी, मिल्कशेक, आईस्क्रीम अशा अनेक डिशेश बनवल्या असतील, पण आता मार्केटमध्ये सध्या आंब्यापासून बनलेल्या एक नव्या पदार्थाची चर्चा आहे. त्यात जर तुम्ही आंबा आणि पाणीपुरी लव्हर असाल तर मग ही डीश तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
डबल मँगो पाणीपुरी –
नुकतीच शेफ सरांश गोईला यांनी या सीझनसाठी वेगळी रेसिपी शोधली आहे. यावेळी शेफ खास आंब्याची पाणीपुरी घेऊन आले आहेत. सरांश गोईलाने त्यांच्या इंस्टाग्रामवर डबल मँगो गोलगप्पाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही रेसिपी पाहून आंबा प्रेमींसोबतच पाणीपूरी लव्हरही खूश झाले आहेत. हे हटके कॉम्बिनेशन कसं बनवायचं ते जाणून घ्या.
डबल मँगो पाणीपुरी रेसिपी –
- १ कच्चा कैरीचे तुकडे
- २ पिकलेल्या आंब्याचे तुकडे
- एक हिरवी मिरची
- ३० ग्रॅम पुदिन्याची पाने
- ४५ ग्रॅम हिरवी कोथिंबीर
- आले एक तुकडा
- साखर हवी तशी
- मसाला, चवीनुसार मीठ
१ कच्चा कैरीचे आणि २ पिकलेल्या आंब्याचे लहान चौकोनी तुकडे करा. आले, १ हिरवी मिरची, ३० ग्रॅम पुदिन्याची पाने, ४५ ग्रॅम कोथिंबीर, साखर पाण्यासोबत बारीक करून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यावर एका भांड्यात बर्फ टाकून त्यात हे मिश्रण टाका. त्यावर चाट मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ घाला. या मिश्रणात बुंदी आणि आंब्याचे तुकडे टाका. तुमची डबल मँगो पाणीपुरी रेसिपी तयार आहे.
हेही वाचा – गाजराचा जन्म कुठे झाला ? आंतरराष्ट्रीय गाजर दिनानिमित्त जाणून घ्या ‘या’ रंजक गोष्टी
या रेसिपीने केवळ आंबाप्रेमीच खूश नाहीत होणार तर पाणीपुरी लव्हर्सलाही ही नवीन डिश खूप आवडेल.