यंदाच्या दिवाळीमध्ये देशातील दिल्लीएनसीआरसह अनेक भागात वाढत्या प्रदुषणामुळे फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावा बंदी घालण्यात आली होती. पण बाजारात असे अनेक फटाके दिसून आले जे कमी धुर निर्माण करतात आणि ज्यामुळे वायू प्रदुषण होण्याची समस्या निर्माण होत नाही. असाच एक फटाका म्हणजे आपटी बॉम्ब ज्याला pop pop crackers असेही म्हणतात. हा फटाका विशेषत: लहान मुलांसाठी तयार केलेला आहे पण जवळपास प्रत्येक वयोगटातील लोक हा फटाका फोडण्याचा आनंद घेताना दिसतात. तुम्ही आपटी बॉम्ब जमिनीवर आपटून फोडताना पाहिले असेल पण हे कसे तयार केले जातात हे तुम्हाला माहिती आहे का?
असे बनवले जातात आपटी बॉम्ब
इंस्टाग्रामवर ys_gyan नावाच्या अकांउटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये आपटी बॉम्ब पटाखे तयार होताना दिसतात. व्हिडीओमध्ये दिसते की, हे फटाके तयार करण्यासाठी सर्वात आधी वाळूमधील छोटे छोटे खडी मशीनमध्ये टाकून साफ केले जाते. मग दुसऱ्या मशीनमध्ये सुकवले जातात. त्यानंतर त्यावर सिल्वर फल्मिनेट लावले जाते.त्यामुळे फटक्या आपटल्यानंतर मोठा आवाज करत फुटतो. शेवटी मशीनमधून ही खडी रंगीत कागदात गुंडाळली जाते आणि डब्यांमध्ये भरून बाजारा विकी साठी पाठवले जाते.
हेही वाचा- जमिनीखाली सापडले ४०० वर्ष जुने शिव मंदिर; सोशल मीडियावर व्हायरल झाले व्हिडीओ
हेही वाचा- ३० नोव्हेंबरला ‘या’ राशीची होणार चांदी; शुक्रदेवाची होणार कृपा; होईल आर्थिक लाभ
व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे, यावर जवळपास ९० हजार लाइक्स आहेत. या व्हिडीओवर एकाने लिहिले की, “हे खूप धोकादायक आहे, जर हातामध्ये सावधगिरीने पकडले नाही तर….तुम्ही तुमच्या हातांना नुकसान पोहचवू शकता.” दुसऱ्याने लिहिले की, “आम्ही त्याला लसून बॉम्ब म्हणतो.” तिसऱ्याने सांगितले की, “यावेळी दिवाळीमध्ये फक्त हेच फटाके फोडले”