Viral Video : सध्या फाटक्या कपड्यांची फॅशन खूप सुरू आहे. अशात फाटलेल्या जीन्सचा ट्रेंड सर्वाधिक लोकप्रिय आहे. अनेक जण फाटलेली जीन्स घालून या फॅशनला फॉलो करताना दिसतात. फाटक्या जीन्सवर अनेक ठिगळं पडलेली असतात. जितकी जास्त जीन्सला ठिगळं तितकी जास्त या जीन्सची किंमत असते.
पण तुम्हाला माहिती आहे का जीन्सला हे ठिगळं कशी पाडली जातात आणि फाटलेली जीन्स कशी तयार केली जाते? आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
सध्या इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जीन्सला ठिगळं पाडली जात आहे. फाटलेली जीन्स तयार करण्यासाठी साध्या जीन्सवर ठिगळं पाडली जात आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल एका निळ्या रंगाच्या जीन्सवर ठिगळं पाडायची आहे त्या ठिकाणी आकार आखलेला आहे आणि पुढे या आकारानुसार मशीनद्वारे जीन्सवर ठिगळं पाडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. फाटकी जीन्स खरेदी करण्यासाठी तुम्ही अतिरीक्त हजारो रुपये खर्च करता ती फाटलेली जीन्स १० ते १५ मिनिटांमध्ये तयार होते.
हेही वाचा : रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका; जया किशोरी यांनी सांगितला मूलमंत्र….
beaverart.engineer1 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “मला आजपर्यंत समजले नाही चांगली जीन्स आपण अशी का खराब करतो?” तर एका युजरने व्हिडीओ पाहून लिहिलेय, “चांगली जीन्स खराब केली” आणखी एका युजरने विचारले, “मला ही मशीन कुठे मिळेल?”