How to remove glass bangles video: सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ जुगाडचे, तर काही नवनवीन माहिती देणारे असतात. यातून सगळ्यांनाच शिकण्यासारखं खूप काही असतं. असे जुगाड अनेक जण घरी ट्रायदेखील करत असतात. सध्या असाच एक जुगाड एका मेकअप आर्टिस्टने सोशल मीडियावर शेअर केलाय, जो तुफान व्हायरल होतोय. प्रत्येक लग्न झालेल्या महिलेने हा जुगाड पाहिलाच पाहिजे.
हिरव्या बांगड्या काढण्याचा जुगाड
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका मेकअप आर्टिस्टने हिरव्या बांगड्या न तुटता किंवा हाताला न लागता कशा काढाव्या याचा जुगाड सांगितला आहे. अनेकदा हिरव्या बांगड्या हातातून काढताना तुटतात किंवा त्या हाताला लागतात आणि मग जखम होते. म्हणूनच सगळ्यात सुरक्षित आणि सोपा जुगाड या मेकअप आर्टिस्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
हेही वाचा… हा नाद रक्तात असावा लागतो! चिमुकल्याने जे केलं ते करताना तुम्हीही दोनदा विचार कराल, VIDEO एकदा पाहाच
या व्हिडीओमध्ये एक प्लास्टिकची पिशवी हातात घालायची, ती बांगड्यांच्या आतल्या बाजूने घालून घ्यायची असं सांगितलं आहे. त्यानंतर कोणतंही हेअर ऑईल घेऊन त्याला पिशवीवर लावायचं आणि मग व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे पिशवीच्या दोन टोकांना ओढून अलगद बांगड्या हातातून बाहेर काढायच्या. या पद्धतीने अगदी सहजपणे बांगड्या निघतात आणि कोणती इजाही होत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @darpan_makeup_studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘काचेच्या बांगड्या हाताला न लागता कशा काढाव्या’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ५.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ताई ही खूप जुनी पद्धत आहे”, तर दुसऱ्याने “मस्त कल्पना आहे,” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “खूपच छान माहिती सांगितली तुम्ही.” तर अनेकांनी ही पद्धत जुनी आहे आणि माहीत आहे असं सांगत प्रतिक्रिया दिल्या.