Viral Video : सध्या पावसाळा सुरू झाला. लोक पावसाळ्यात निसर्ग न्याहाळण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहे. नदी, तलाव, झरे, धबधबे इत्यादी पाण्याच्या ठिकाणी गर्दी करताहेत. वर्षाविहार करताना अनेकदा सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घडली होती. अशा घटना ताज्या असताना सुद्धा काही लोक काळजी घेताना अजिबात दिसत नाही.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अचानकपणे पुरात वाहून गेलेल्या लोकांना कसे वाचवायचे, हे दाखवले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (How to save people who are swept away by floods video goes viral on social media)

हेही वाचा : “भूक किती वाईट असते ना!” पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटाच्या पोस्टरला हात लावून चिमुकल्याने भरलं पोट, हृदयद्रावक Video Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्याला पुरात वाहणाऱ्या लोकांना कसे वाचवायचे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. व्हिडीओत दोन मुलांना दोरीच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहे. या दोन्ही मुलांनी लाइफ जॅकेट घातले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवास धोका नाही. या व्हिडीओच्या माध्यामातून लोकांना सांगितले की पुरात वाहून जाणाऱ्या लोकांना कसे वाचवायचे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही फक्त एका दोरीच्यामदतीने कसे वाचवू शकता. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ, येथे क्लिक करा

https://www.instagram.com/reel/C8–wJEvb4s/?igsh=ZDNzY3ZnN2Vid2x3

हेही वाचा : ताम्हिणी घाटात बाईक घेऊन जाण्याआधी ‘हा’ VIDEO पाहा; रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांचं काय झालं बघाच

vashu.gupta.vlog या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लोकांना असे वाचविण्यात आले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हल्ली पाण्याच्या ठिकाणी अनेक लोक वाहून जात आहे. अशा अनेक घटना समोर येत आहे. देवा, सर्वांवर कृपा कर” तर एका युजरने लिहिलेय, “जर अशी परिस्थिती आली तर कसे वाचवायचे, हे दाखवत आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “जनजागृती पसरवण्यासाठी हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे.” अनेक युजर्सना ही ट्रिक आवडली आहे.

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  पश्चिम बंगाल येथील दीघा बीचवरील हा व्हिडीओ होता. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये असंख्य लोक समुद्र किनारी लाटांचा आनंद घेताना दिसले होते. लोक जीव धोक्यात घालून समुद्राच्या पाण्यात उतरले होते. त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.