How to save tax : अर्थसंकल्प २०२४ सादर झाल्यानंतर नोकरदारांना प्राप्तीकराची चिंता सतावत आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक मिम्सही व्हायरल झाले आहेत. अर्थला निर्मला सीतारमण यांच्या फोटोला घेऊनही अनेकजणांनी मिम्स तयार करत आपली उद्विगणता विनोदाच्या माध्यमातून प्रकट केली आहे. सध्या कर्नाटकमधील एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्यक्ती नोकरदारांना १०० टक्के कर वाचविण्याची युक्ती सांगत आहे. ही युक्ती गंमतीशीर असली तरी अनेकांना त्यातली गंमत भावली असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

डिजिटल कंटेंट क्रिएटर श्रिनिधी हांडे यांनी अर्थसंकल्पानंतर त्यावर भाष्य करणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया साईटवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एक्स या सोशल मीडिया साईटवर अखिल पचोरी नामक सनदी लेखापाल यांनीही या व्हिडीओला शेअर केले आहे. नोकरदारांनी कर वाचविण्यासाठी हांडे यांनी काय युक्ती सुचविली ती ऐकूया.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

गवत लावा प्राप्तीकर वाचवा

व्हिडीओमध्ये हांडे म्हणतात, मी तुम्हाला १०० टक्के प्राप्तीकर वाचविण्याची युक्ती सांगणार आहे. ही युक्ती अतिशय किफायतशीर असून तीन टप्प्यात अवलंबवयाची आहे. तसेच कायदेशीर कसोटीवरही ही युक्ती टिकणारी आहे. “तुम्हाला गवत लावायचे आहेत. तुमच्या बाल्कनी किंवा गच्चीवर तुम्ही गवत लावू शकता. गवत लावणं अवघड नाही आणि कायदेशीर आहे. आता तुम्ही तुमच्या एचआरला जाऊन सांगा की, तुम्हाला वेतन नको. एचआर तर आनंदी होईलच. वेतनाच्या बदल्यात तुमच्याकडील गवत कंपनीला विकत घ्यायला सांगा. म्हणजे समजा तुमचे वेतन ५० हजार असेल तर गवताच्या ५० पेंढ्या कंपनीला द्या. एक पेंढीचे १००० रुपये पकडले तरी तुमचा पगार निघून जाईल आणि हे संपूर्णपणे कायदेशीर आहे.

या युक्तीमागचे कारण विशद करताना हांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, “आता तुम्हाला वेतनाद्वारे मिळणारे उत्पन्न शून्य आहे. तुम्ही गवत विकून जे पैसे मिळविले, ते तुमचे शेतीतले उत्पन्न धरले जाईल. शेतीवर भारतात कर नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा शंभर टक्के प्राप्तीकर वाचवू शकाल. तसेच टीडीएस आणि इतर गुंतवणूक वैगरेचीही झंझट राहणार नाही.”

या व्हिडीओवर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय लोक कोणताही जुगाड करू शकतात, असे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी ग्रॉस सॅलरी या शब्दाला ग्रास सॅसरी असे संबोधले आहे.

हे वाचा >> Budget 2024 : करसमाधानाचा वेध; नवीन प्रणाली स्वीकारणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना सवलती!

अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी काय?

केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला एकंदरीत दिलासादायी काही नसले, तरी पगारदार करदात्यांना प्राप्तिकरात प्रमाणित वजावटीची मर्यादा ५० टक्क्यांनी वाढूवन ती ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. मात्र हा लाभ नवीन कर प्रणाली स्वीकारल्यासच करदात्यांना मिळू शकेल. शिवाय नवीन कर प्रणालीतील करटप्प्यातदेखील बदल करण्यात आल्याने, नोकरदारांच्या हाती अधिक पैसा राहणार आहे.

नोकरदारांसाठी चालू आर्थिक वर्षात नवीन कर प्रणालातील वजावट ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या बदलांमुळे नवीन कर प्रणालीत करदात्यांचे वर्षाला १७ हजार ५०० रुपये वाचणार आहेत. कुटुंब निवृत्तिवेतनातून मिळणाऱ्या वजावटीची मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. याचा फायदा चार कोटी नोकरदार आणि निवृत्तिवेतनधारकांना होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.