How to write a paper for hsc and ssc board exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा राज्यात सुरु झाली आहे. आपण कितीही कृती पत्रिका सोडवण्याचा सराव केला असला तरीसुद्धा परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर घाईगडबडीत आपण अनेक चुका करतो. आपला पेपर चांगला आणि टापटीप असेल तर पेपर तपासणारे शिक्षकही मार्क देताना विचार करतात. पेपरमध्ये जर चुका खाडाखोड किंवा गजबजलेला असेल तर तपासणाऱ्याचा गोंधळ उडतो अशावेळी उत्तर बरोबर लिहूनही मार्क कापले जाण्याची शक्यता असते. अनेक वेळा शाळा-कॉलेजमध्येही पेपक कसा सोडवावा यावर खास एक तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं मात्र तरीही बऱ्याचवेळा पेपल लिहिताना चुका होतात.

काही विद्यार्थ्यांची तक्रार असते की, सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहिली. पण तरी देखील शिक्षकांनी मार्क कमी दिले. . मात्र असं का होतं? शिक्षक त्यांचे मार्क का कापतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हायरल व्हिडीओमध्ये मिळेल. बरं, एवढंच नाही तर तुम्हाला सुद्धा परिक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवायचे असतील तर या व्हिडीओमध्ये एक सोपी ट्रीक सांगितली आहे. जर ती ट्रीक तुम्ही वापरतील तर पहिला नंबर मिळवण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या उत्तर पत्रिकेवरील विद्यार्थ्याचं अक्षर किती सुरेख आणि सुटसुटीत आहे. तसेच त्यानं प्रत्येक प्रश्नाच उत्तर व्यवस्थित खाडाखोड न करता लिहली आहेत. सोबतच काही उत्तर हायलाईट केली आहेत तर काहीठिकाणी चौरस आखले आहेत जेणेकरुन उत्तरं ठळक दिसतील. एकूणच उत्तराबरोबर तुमचं प्रझेंटेशनही महत्त्वाचं आहे.थेअरम असल्यास त्याची आकृती काढून तो व्यवस्थित मांडणं अपेक्षित आहे. गणित सोडवताना शक्यतो एका पानावर एक गणित अशा हिशोबानं सोडवावं. आपला पेपर साधारण ३० ते ३५ पानांचा असतो. याशिवाय सप्लिमेंटची सुविधा असते. त्यामुळे पेपर सुटसुटीत आणि स्वच्छ वाटेल असा सोडवा. त्याचा परिणाम आपल्या गुणांवर होत असतो. अक्षर बारी किंवा फार मोठं असेल तर मोकळं आणि योग्य जागा सोडून लिहावं. ज्यामुळे पेपर दिसायला सुटसुटीत दिसेल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ rahul_99_km नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवर आणखी वेगवेगळ्या टिप्स विद्यार्थ्यांसाठी दिल्या आहेत.

Story img Loader