तुमच्यापैकी अनेकजण ऑफिसला जाताना रोज फॉर्मल शूजचा वापर करत असतील. शर्ट, पॅन्ट अशा फॉर्मल ड्रेसअपखाली शूजमुळे एक चांगला गेट मिळतो आणि तुम्ही खरचं एखादे ऑफिसर असल्यासारखे दिसू लागता. त्यामुळे अनेकांना शूज वापरणे आवडते. केवळ ऑफिसला जातानाच नाही तर हल्ली पार्टी, फंक्शन आणि इतर वेळीही आपल्या गेटअपला सूट होतील असे शूज अनेकजण आवडीने घालतात. त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला शूजचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. अगदी ५०० रुपयांपासून मिळणाऱ्या या शूजमुळे पायांना अगदी आरामदायी वाटते. विशेषत: थंडीच्या दिवसात सर्वाधिक लोक शूजचा वापर करतात. पण फॅक्टरीमध्ये हे शूज नेमके कशा पद्धतीने बनवले जातात हे कधी पाहिले आहे का? चला तर मग जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात फॅक्टरीमध्ये शूज कसे बनवले जातात ते पाहू शकता. यात तुम्ही शूजसाठी लागणाऱ्या कच्च्या मालापासून ते फायनल टच अपपर्यंत सर्व काही प्रोसेस पाहू शकता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओत सुरुवातीला एका मोठ्या प्लास्टिक शीटवर आधी एक कापडी शीट चिटकवली जाते. ज्यापासून शूजचे सोल तयार केले जातात. यानंतर दुसरीकडे अगदी चामड्यासारख्या दिसणाऱ्या कापडाने शूजच्या वरील कोटिंग तयार केली जाते. यासाठी एक व्यक्ती मशीनवर शूजच्या आकारातील कापड शिवत असतो. या दोन गोष्टी तयार झाल्यानंतर कारागिर हाताने शूज तयार करतात. यानंतर शेवटी शूजला पॉलिश केले जाते.

शूज मेकिंगचा हा व्हिडीओ @smartest.worker नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, कारागिरीला सलाम. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, जेवढे सोने घासाल जाईल तेवढे ते अधिक चमकदार होईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to shoes are made in a factory video goes viral see amazing shoe making process sjr
Show comments