ट्रेनमधून दररोज असंख्य लोक प्रवास करत असतात. या ट्रेनमध्ये अनेकदा वेगळं काहीतरी पाहायला मिळतं. ट्रेनमधील गर्दी, माणसांची भांडणं अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच घडत असतात. या गजबजाटात दूरवर प्रवास करणारी माणसं शांत झोपेसाठी काय करता येईल याचा विचार करतात.

ट्रेनचा प्रवास जर खूपच लांबचा असेल तर चांगली झोप मिळावी यासाठी प्रवाशांची धडपड असते. ट्रेनमध्ये सीट रिझर्व्ह करून बसायला जागा मिळाली तरी चांगली झोप मिळणं हा एक प्रश्नच असतो. त्यात स्लीपर कोच नसल्याने बसल्या बसल्या झोप काढताना अचानक तोल जाण्याचा धोकाच असतोच. म्हणून बसल्या बसल्या मस्त झोप घेण्यासाठी एका माणसाने जगात भारी जुगाड शोधून काढलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय केलंय या माणसाने ते एकदा वाचाच…

झोपेसाठी ट्रेनमध्ये काकांनी केला जुगाड

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ट्रेनमध्ये एका माणसाने झोपेसाठी आगळा वेगळा जुगाड केला आहे. चांगली झोप मिळण्यासाठी या माणसाने जो जुगाड केलाय तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस ट्रेनमध्ये आपल्या सीटवर बसला आहे, पण झोप अनावर झाल्याने आणि चांगली झोप मिळावी म्हणून या माणसाने चक्क वरच्या बाजूला एक कपडा बांधला आहे आणि त्या कपड्यावर आपला चेहरा ठेवत हा माणूस अगदी सुखाची झोप घेताना दिसतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @its_ravi_singhaniya4 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बिहारचा जुगाड” अशी कॅप्शन याला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ४.१ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

माणसाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असं वाटतंय, काकांनी फाशीच लावलीय”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे बघून खूप वाईट वाटलं”, तर तिसऱ्याने “झोप ही खूप मौल्यवान गोष्ट आहे, म्हणूनच झोपेला ‘सोना’ म्हणतात” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “काका जरा जपून, नाहीतर झोपेतच फाशी लागायची.”

Story img Loader