उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. आपल्या चाहत्यांबरोबर ते नेहमी रंजक आणि प्रेरणादायी गोष्टी शेअर करत असत्ता.३० सप्टेंबर रोजी महिंद्रा यांच्या ‘मंडे मोटिव्हेशन’ पोस्टमध्ये आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कसे करावे हे सांगितले. त्यांना प्रेरणा देणाऱ्या एका गरुडाचा व्हिडिओ त्यांनी एक्सवर शेअर केला आहे. वापरला.

गरुडाला तीक्ष्ण नजरसाठी ओळखले जाते. दूर अंतरावर असलेले शिकार देखील हा पक्षी पाहू शकतो. एवढंच काय तर डोळ्यांच्या पापण्या मिटतानाही त्याचे लक्ष अजिबात विचलित होत नाही. हाच व्हिडिओ आनंद महिंद्रा यांना प्रचंड आवडला आहे. पापण्या मिटतानाही गरूड आपल्या ध्येयावरील नजर हटवत नाही ही गोष्ट त्यांना खूप भावली आहे. या पक्ष्याकडून आनंद महिंद्रा यांनी धे्येयावर लक्ष केंद्रीत कसे करावे यासाठी प्रेरणा मिळाली आहे. ही प्रेरणा आपल्या चाहत्यापर्यंत पोहचवली आहे.

आजच्या काळात ध्येयावर लक्ष केंद्रीत करताना खूप अडथळे येतात. अशावेळी स्वत:ला ध्येयापासून दूर जाऊ देऊ नका. कारण प्रत्येक गोष्ट माहितीचा स्रोत असू शकते. पण लक्ष केंद्रित करा. आपल्या ध्येयावर अथक लक्ष केंद्रित केले आहे,” महिंद्राने व्हिडिओ शेअर करताना त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – पुणेरी आजीनंतर आता पुणेरी आजोबांचा Video Viral! “काठी न घोंगड घेऊ द्या की रं” गाण्यावर आजोबांनी केला भन्नाट डान्स

येथे पाहा व्हिडीओ

क्लिपमध्ये दिसते की, गरुड डोळ्याची पापणी मिटतानाही आपली तीक्ष्ण नजर आपल्या ध्येयावर ठेवतो. त्याचप्रमाणे आपण देखील जीवनाच्या सतत विचलित होऊनही अचूकतेने लक्ष केंद्रित करू शकतो.

अपेक्षेप्रमाणे, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हिडीओवर सकारात्मक त्वरित प्रतिसाद दिला. एका वापरकर्त्याने निदर्शनास आणले की,”हा व्हिडीओ विचलित न होणे अशक्य असताना खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर पुन्हा लक्ष केंद्रित करा असे सुचवत आहे.

हेही वाचा –“स्वत: चीनची आहे अन्…” कॅनडामध्ये भारतीयांची संख्या जास्त म्हणणाऱ्या महिलेवर भडकले नेटकरी, पाहा Viral Video

“जगात गोंधळ सुरु असू शकतो, परंतु हे खरोखर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे कारण नाही! प्रत्येक व्यत्यय हे ध्येयावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी आणखी एकदा आठवण करून देतो. तुमची नजर ध्येयावर ठेवा आणि स्वत:ला अडवू नका,” असे एकाने सांगितले.

आणखी एकाने जोडले, “आजच्या वेगवान जगात लक्ष केंद्रित करणे हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वाचे आहे. अथक लक्ष केंद्रित केल्याने अनावश्यक आवाज फिल्टर करण्यात आणि खरोखर महत्त्वाच्या गोष्टींचा आदर करण्यात मदत होते.”

“माणसाचे फोन आणि सोशल मीडिया यांसारखे अनेक गोष्टींमुळे लक्ष विचलित होते. त्यांनी गरुडांसारखे लक्ष केंद्रित करण्यास शिकले पाहिजे, कारण हे विचलित मन अनेकदा मदतीपेक्षा जास्त नुकसान करतात,” वापरकर्त्यांपैकी एक म्हणाला.