Jugad viral video: कुत्रे गाडीचे टायर, खांबावर का लघवी करतात? कुत्र्यांना उभं राहिल्यावर न वाकता किंवा बसता ज्या उंचीपर्यंत वास घेता येतो तितक्या उंचीवर ते लघवी करतात. शिवाय जमिनीवर पाण्याने किंवा धुळीने हा गंध काही वेळाने नाहीसा होऊ शकतो; पण, धातूचे खांब किंवा रबरी टायरवर गंध अधिक काळ तसाच राहतो. म्हणूनच थेट जमिनीवर लघवी न करता कुत्रे खांब, वाहन तसेच त्याच्या चाकावरच करतात. अनेकदा कुत्रा किंवा मांजर कारवर चढून कारचं नकसानही करतात. तुम्हीही जर या प्राण्यांना वैतागला असाल आणि यापासून सूटका हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. एका तरुणानं आपल्या कारवर कुत्रा मांजर चढून घाण करु नये म्हणून एक भन्नाट जुगाड शोधलाय, याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भटके कुत्र्यांच्या त्रासाने अनेक सोसायटीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे श्वान सोसायटीत प्रवेश करतात आणि परिसरात गाड्यांवर घाण करून ठेवतात. एवढेच नव्हेतर काही श्वान पाळणारे सकाळी किंवा सायंकाळी त्यांच्या पाळीव प्राण्याला घेऊन परिसरात फिरतात. यावेळी ते रस्त्याच्याकडेला, रस्त्यावर किंवा एखाद्या घराच्या प्रवेशद्वारासमोर देखील घाण करतात. यावर मात्र एका तरुणानं जबरदस्त असा जुगाड शोधलाय आता प्राणी गाडीवर घाण काय गाडीजवळ जाणारही नाहीत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, असं केलं तरी काय? तर या तरुणानं…चला जाणून घेऊ.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गाडीला वर खाली एका कव्हरने झाकलं आहे. मात्र हे कव्हर साधं नाहीये यावर टोकदार काटे आहेत. या प्रकाराला कॅट सेफ्टी टूल असं म्हणतात. यामध्ये एका कापडावर टोकदार मेटलचे काटे लावले जातात. आता या गाडीवर कोणताही पक्षी किंवा प्राणी बसणार नाही.कारण जर कोणी बसण्याचा प्रयत्न केला तर तो काटे लागून जखमी होऊ शकतो. या जुगाडमुळे आता या प्राण्यांपासून कायमची सुटका मिळू शकते. त्यामुळे कुत्रा मांजर काय वाघही तुमच्या गाडीजवळ येणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “बाईईई हा काय प्रकार” धावती मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा; दोन व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO झाला व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ srunjay_46 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकरी पसंती देत असून हा भन्नाट जुगाड नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to stop animals to sit on the car jugad video goes viral on social media srk