अर्ध्याधिक मुंबईकरांच्या दिवसातील किमान तीन तास तर प्रवासातच जातात. घर आणि ऑफिसच्या चक्रात अडकलेल्या मुंबईकरांना आराम तरी कुठून मिळणार म्हणा. म्हणून ९, १० तासांची शिफ्ट करून थकले भागलेले अनेक जण प्रवासात जमेल तेवढी आपली झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोकलमध्ये पेंगणारे अनेक दिसतील. कधी कधी तर काही जण इतके गाढ झोपी जातात की कधी आपण उशी समजून दुस-याच्या खांद्याच्या वापर केला हे कळतच नाही. इतर सहप्रवासी तरी काय करणार म्हणा शेजारचा बिचारा दमला आहे त्यामुळे गप्प बसतात. काही जण रागाने डोके बाजूला करतात पण गाढ झोपेत असलेल्या माणसाला थोडीच कळणार. दोन मिनिटे स्वत:ला सावरून पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे सुरु असते.
त्यामुळे ट्रेनमध्ये सहप्रवाशाच्या खांद्याचा वापर डुलकी घेण्यासाठी करणा-या तमाम लोकांसाठी एका अवलीयाने भन्नाट उपाय शोधला आहे. ट्रेनमधली डुलकी ही सगळ्यांचा आपुलकीचा विषय असल्याने साहजिक या अवलीयाचा उपाय लगेच व्हायरल देखील झाला. या अवलीयाचे नाव आहे जोसेफ. तसा युट्युबवर तो खूप प्रसिद्ध आहे. कारण आपल्या दैंनदिन जिवनातील समस्येवर अनेक उपाय जोसेफने शोधून काढले आहे. हा जोसेफ आपली क्रिएटीव्हीटी वापरून भन्नाट मशीन्स बनवतो. आता ट्रेनमध्ये झोपा काढणा-यांसाठी देखील त्याने असेच मशीन बनवले आहे. व्हॅक्यूमला क्लिप अडकवलेली दोरी बांधून तो त्याने ट्रेनच्या काचेवर लावला आहे. आता पुढे त्याने काय केले हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागणार आहे. जोसेफने न्यूयॉर्कमधल्या एका मेट्रो ट्रेनमध्ये हा प्रयोग केला आहे. हा व्हिडिओ जरी अमेरिकन लोकांसाठी बनवला असला तरी त्यांच्या काय आणि आपल्या काय प्रवास करणा-या सगळ्यांच्या समस्या समानच म्हणून की काय येथेही हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Story img Loader