Viral funny video: पाऊस सध्या जोमात सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्याने उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात आपण स्वतःच्या राहणीमानावर विशेष लक्ष ठेवतो. पावसाळ्यात कपड्यांविषयी बोलायला गेलं तर, या सीझनमध्ये लोक पाश्चात्य पोशाख घालणे पसंत करतात. मात्र, ज्या महिला नेहमी साडी नेसतात त्यांना मात्र पावसाळ्यात फार त्रास होतो. पावसामुळे ओल्या झालेल्या साड्या लवकर वाळत नाहीत, त्यामुळे ऑफिसमध्ये किंवा बाहेर गेल्यावर तसंच बसावं लागतं. छत्री सांभाळू की साडी सावरू असा प्रश्न महिलांना पडतो आणि शेवटी ऑफिस गाठेपर्यंत त्या संपूर्ण भिजलेल्या असतात किंवा साडीच्या निऱ्या तरी खराब होऊन भिजलेल्या असतात.
मात्र आता काळजी करू नका, कारण आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्हाला पावसाळ्यात साडी नेसल्यावर छत्री कशी पकडायची हे शिकायला मिळेल. एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून ती यामध्ये फक्त साडी नेसल्यावर छत्री कशी पकडायची हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. मात्र, याच व्हिडीओला २५ लाख लोकांनी पाहिलंय; तर चला बघूयात या व्हिडीओमध्ये असं आहे तरी काय..
२५ लाख लोकांनी पाहिलेल्या VIDEO मध्ये आहे तरी काय?
तर या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडायची याची व्यवस्थित माहिती देत आहे. सगळ्यात आधी छत्रीचं बटण प्रेस करून छत्री ओपन करा, त्यानंतर साडीच्या पदराचा एक कॉर्नर घ्या आणि पुढे पदराला व्यवस्थित खोचा. त्यानंतर साडीच्या निऱ्या एका हाताने धरून व्यवस्थित चाला. या पद्धतीने तुम्ही चाललात तर छत्री धरून अगदी सहज बॅगसहित चालता येतं. भाजी घेण्यासाठी, कुठेही बाहेर जाण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. इथपर्यंत ठीक आहे, पण महिलेनं दिलेल्या माहितीवरून नेटकरी तिला खूप ट्रोल करत व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या प्रतिक्रिया वाचून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Viral Video: भयंकर! बेडवर झोपण्यासाठी गेली व्यक्ती; विचित्र आवाज आल्याने गादी उचलताच बसला धक्का
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडीओ karishma_dheeraj3 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. यावर नेटकरी गमतीशीर प्रतिक्रिया देत असून एका महिलेनं कमेंट केलीय की, “दुसऱ्या कलरची छत्रीपण अशीच पकडायची का?”, तर दुसऱ्या युजरने “एवढं अवघड काम तुम्ही कसं करता? ह्या बद्दल तुमची चांद्रमोहिमेसाठी निवड करावी अशी मागणी करणार आहे”, अशी कमेंट केलीय. आणखी एकानं कमेंट केलीय की, “अहो ताई, तुम्ही छत्री कशी उघडायची ते सांगितलं, पण बंद करायची कशी ते सांगायला मात्र विसरून गेलात.” या सगळ्या कमेंट वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल एवढं नक्की.