Viral Video : सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. फराळ बनवण्यापासून कपडे खरेदीपर्यंत सर्व जण त्यात सध्या मग्न आहे. जर तुम्हाला यंदा दिवाळीत पारंपारिक वेशभूषा करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
दिवाळीला तुम्ही नऊवारी साडी नेसून एक हटके लूक करू शकता. आज आपण नऊवारी साडी कशी नेसायची, हे जाणून घेणार आहोत.
नऊवारी साडी ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रीयन महिलांचा पारंपारिक पोशाख म्हणून याची ख्याती आहे.सोशल मीडियावर नऊवारी साडी कशी नेसायची? यावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर नऊवारी साडी कशी नेसायची, हे सांगितले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक तरुणी नऊवारी साडी नेसताना दिसत आहे. सुरुवातीला साडी कमरेभोवती गुंडाळा आणि दोन्ही बाजूला साडीचा समान भाग सोडा.त्यानंतर साडीचा एक भाग पायाखालून आणायचा आणि हव्या त्या आकाराच्या निऱ्या घालायच्या. या निऱ्या मागील बाजूला एकत्र करुन आत खोचायच्या. त्यानंतर साडीचा दुसरा भाग पायाखालून आणायचा आणि नीट प्लेट्स करुन खांद्यावर पदर घ्यायचा. तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावे लागेल.
हेही वाचा : सुपर से ऊपर! नवरदेवाने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
santoshi_megharaj या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”पाहा..नऊवारी साडी कशी नेसायची?” एका युजरने लिहिलेय, “खूप छान” अनेक युजरनी कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.