गोव्यात पुरेसे बहुमत नसतानाही भाजपने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेची तयारी केली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेण्यासाठी मनोहर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पर्रिकरांच्या गोवा वापसीवर समाज माध्यमांवर अनेकांनी भाष्य केले आहे. दोन वर्षे संरक्षण मंत्रालय सांभाळणाऱ्या पर्रिकरांनी गोव्याचे नेतृत्व करण्यासाठी राजीनामा दिला आहे. यावर समाज माध्यमांवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. यातील काही प्रतिक्रिया अतिशय मनोरंजक आहेत.

Story img Loader