ओला, उबेर या टॅक्सींची क्रेझ गेल्या काही वर्षांत वाढली आहे. ऑफिस, रेल्वे स्टेशन, शॉपिंग, विमानतळावर किंवा मित्र-नातेवाईकांना भेटण्यासाठी अनेकजण ओला-उबेर टॅक्सी वापरतात. ओला आणि उबेर टॅक्सी सामान्यतः सोयीस्कर आहेत. मोबाईलवर एक क्लिकवर दारात गाडी येते. दरम्यान तुम्हाला माहिती आहे का की अनेकदा ड्रायव्हर तुमची राइड रद्द करतात आणि यामुळे त्यांना चांगले पैसेही मिळतात. अशाच एका अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाती ७० वर्षीय उबेर ड्रायव्हरने ग्राहकांच्या राईड्स रद्द करून चक्क २३ लाख रुपये कमावले आहेत. एका उबेर ड्रायव्हरने स्वत: सांगितलं आहे की त्याने राइड्स रद्द करून चांगली कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवृत्तीनंतर नवी इनिंग सुरु

या ड्रायव्हरने ग्राहकांना फक्त नकार देत २३ लाख रुपये कमावले आहेत. सहा वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर चालकाने पैसे कमावण्यासाठी पार्ट टाइम चालक म्हणून काम सुरु केलं होतं. पण यावेळी त्याला आपण लखपती होऊ याचा अंदाजही नव्हता. उबर ड्रायव्हर बिल यांनी म्ंहटलं आहे की त्यांनी ग्राहकांकडून आलेल्या विनंत्यांपैकी फक्त १० टक्के स्वीकारल्या आहेत आणि ३० टक्क्यांहून अधिक राइड्स रद्द केल्या आहेत. या ७० वर्षीय व्यक्तीने निवृत्तीनंतर काही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी उबर चालक होण्याचा निर्णय घेतला.

एका वर्षात कसे कमावले २३ लाख?

या उबेर चालकाने सांगितले की, तो जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच उबरच्या राईड्स स्वीकारत असे. त्यांच्यासाठी ही आयडीया चांगलीच फायदेशीर ठरली. २०२२ मध्ये या व्यक्तीने १५०० ट्रिप रद्द करून चक्क २३.३ लाख रुपये कमावले आहेत. पूर्वी उबर ड्रायव्हर बिल हे दर आठवड्याला ४० तास काम करत असे, परंतु नंतर ते ३० तासांवर आणले. परिसरातील वाढलेल्या किंमती यामुळे त्यांचे गाडी चालवण्याचे तास कमी झाले.

दरम्यान त्यांनी यामध्ये स्मार्टवर्क केलं..ते बारमध्ये आणि विमानतळाच्या आसपास रात्री १० ते २.३० पर्यंत थांबायचे. कारण रात्रीच्यावेळी या राईड्सचे भाडे डबल होत असे. तसेच ते वन वे राईड टाळायचे. एका घटनेबद्दल बोलताना या उबर ड्रायव्हरने सांगितले की, एकदा त्यांनी एका ग्राहकाला दोन तासांच्या ड्राईव्हवर नेले आणि त्यांना फक्त २२४६ रुपये मिळाले. पण परतीला प्रवासी नसल्याने त्यांना काहीच पैसे मिळाले नव्हते.

हेही वाचा >> अस्वलाला मांडीवर बसवून करत होती किस; पुढच्याच क्षणी घडली जन्माची अद्दल; तरुणीचा VIDEO व्हायरल

याआधी एका होमिओपॅथी डॉक्टरने ट्विटरवर सोशल मीडिया साइटवर उबर ड्रायव्हरसोबतचा अनुभव शेअर केला होता. या महिलेने सांगितले होते की, तिला एका उबर चालकाकडून चुकीचा संदेश आला होता. यावर बोलताना उबर ड्रायव्हर बिल यांनी सांगितलं की, या मेसेजनंतर मला खूप भीती वाटली. यानंतर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइटवर लिहिले की, “उबरने असा प्लॅटफॉर्म विकसित केला पाहिजे जिथे ग्राहक ड्रायव्हरवर विश्वास ठेवू शकतील आणि त्यांचा रायडिंगचा अनुभव अधिक चांगला असू शकेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How uber driver 70 earns 23 lakh by cancelling rides know more srk