पुणे शहर गेल्या काही वर्षात खूप बदलले आहे. शहर पूर्वीपेक्षा आता खूप वेगळे आहे. शहराच्या सीमा विस्तारल्या आहेत. अनेक मोठ-मोठे रस्ते आणि पुल बांधण्यात आले आहेत. रस्त्यांवरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी वाहतूक कोंडी देखील वाढली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी म्हटलं की पुणेकरांना चांदणी चौक आठवतो. कारण आजच्या घडीला या चौकातून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक झाले आहे. पण पुणेकरांनो, तुम्हाला आज भुलभुलैया वाटणारा हा चांदणी चौक ११९१मध्ये कसा होता हे माहिती आहे का? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा नक्की बघा.

तुम्हा आज चांदीचौकात गेला तर कोणता रस्ता नक्की कुठे जातो हे कोणालाच समजत नाही कारण याठिकाणी आठ रस्ते एकत्र येतात. नव्याने पुल उभारण्यात आला आहे तरी वाहतूक कोंडी मात्र थोडीही कमी झालेली नाही. पण ११९१ मध्ये चांदणी चौक असा नव्हता. आज चांदणी चौकातील वाहतूक कोंडीने त्रासलेल्या पुणेकरांना १९९१ मधील चांदणी चौक पाहून आश्चर्यचा धक्का बसू शकतो.

Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”

हेही वाचा – “हेच रोहितने कमावले !” व्हिलचेअरवर बसलेला चाहता रोहित शर्माला भेटला, हृदयस्पर्शी व्हिडीओने जिंकले नेटकऱ्यांचे मन

सोशल मीडियावर चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचे व्हिडीओ तुम्ही रोज पाहिले असतील पण सध्या १९९१ मधील चांदणी चौकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जे पाहून पुणेकर अवाक् झाले आहेत. ११९१ मध्ये चांदणी चौकातील रस्ता आजच्यापेक्षा तुलनेने छोटा होता पण तरीही सुटसुटीत होता. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, त्या काळात चांदणी चौकात रस्त्यावर वाहनांची गर्दी नाही. रिक्षा, जुन्या पीएमटी बस मोकळ्या रस्त्यावरून धावताना दिसतात. चांदणी चौकाच्या मधोमध एक दगड उभारल्याचे दिसते. या दगडाच्या चारही दिशांना चार रस्ते जाताना दिसतात. एक रस्ता एनडीए, दुसरा रस्ता कोथरूड पुणे, तिसरा रस्ता पौड, चौथा रस्ता पाषाणच्या दिशेने जात असे दिसतो आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये कोथरुड डेपो दिसत आहे जिथे कोणत्याही इमारती बांधलेल्या नाही. मोकळ्या रस्त्यावरून पीएमटीची बस पीएमटी डेपो जाताना दिसते. हॉटेल बंजारा हिल्स देखील व्हिडीओमध्ये दिसते. दुर दुरवर पसरलेले हिरवे डोंगर दिसतात. हे डोंगर म्हणजे आजच्या काळातील बावधन आहे.

हा व्हायरल व्हिडीओ pune_vibes_official आणि kothrudkarpune यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना या व्हिडीओचे सौजन्य राहूल अब्दागिरी यांना दिले आहे. व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ पाहून पुणेकरांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत आपल्या आठवणी सांगितल्या आहेत.

हेही वाचा – Viral Vadapav Girl चंद्रिका दीक्षितला दिल्ली पोलिसांनी केली अटक? व्हायरल व्हिडीओमध्ये केला दावा, जाणून घ्या सविस्तर…

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले,”आम्ही दर दिवाळीत या चौकामधल्या एका टेकडीवर जात असे.चहा कॉफीची टपरी टाईप एक हॉटेल होतं, जिजाई गार्डन नावाचं. तिथे कॉफी घ्यायची, टेकडीवरून संपूर्ण पुण्याची रौषणाई, फटाके बघायचे. हरवलं सगळं ते आता.”

दुसरा म्हणाला,”अश्रू अनावर झाले. माझे वडील ९०च्या दशकात सायकलने बोपोडीहून एनडीएला कामाला जात होते. किती कष्ट केले आमच्यासाठी”

तिसरा म्हणाला, “नशिबवान आहोत आम्ही, पुण्याचं हे रूप स्वत: पाहिलयं”