तुम्ही अशा अनेक हरित उपक्रमांबाबत ऐकले असेल ज्यामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून काहीतरी उपयुक्त वस्तू तयार केल्या जाता. याबाबत माहिती देणारे अनेक अहवाल समोर येत असतात. पण प्रत्यक्षात ही सर्व प्रक्रिया कशी केली जाते याबाबत माहिती देणारे फार कमी व्हिडिओ उपलब्ध असतात. आता बघा, तुम्ही रोज कागद वापरता? कधी वर्तमानपत्र म्हणून, कधी कागदाची पिशवी म्हणून किंवा इतर गोष्टींसाठी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, कागद कसा तयार केला जातो? कचऱ्यावर प्रक्रिया करून कागद तयार केला जातो हे कदाचित तुम्हाला माहित असेल पण ही प्रक्रिया नेमकी कशी चालते हे तुम्ही कधीही पाहिले नसेल. याबाबत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल पण आता तुम्ही हे जाणून घेऊ शकता. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कचऱ्याचा पुर्नवापर करून कागद कसा तयार जातो याची प्रक्रिया दाखवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा