HR Employee Viral Post : नोकरीसाठी मुलाखत देणं सोपं नसतं. कारण अनेकदा मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात जे ऐकून आश्चर्यचकित व्हायला होते. मुलाखत घेणारे कर्मचाऱ्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या नादात मर्यादा ओलांडताना दिसतात. असाच काहीसा प्रकार एका महिला कर्मचारीबाबत घडला. तिला मुलाखतीत असा काही प्रश्न विचारण्यात आला, जो ऐकून ती तर आश्चर्यचकित झालीच, पण तिने याबाबत केलेली पोस्ट वाचून युजर्स चांगलेच संतापले.
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. महिला कर्मचाऱ्याला एचआरने तिच्या वयाबद्दल विचारणा केली, यानंतर लग्नाचा काय प्लॅन आहे असे विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेवर चिडून लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ज्यावर आता युजर्सनेही त्यांचे मत देत एचआरच्या विचारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
एचआरने लग्नाच्या प्लॅनबद्दल केला असा प्रश्न
जान्हवी जैन (@janwhyy) हिने एक्स पोस्टवर तिच्या या मुलाखतीचा अनुभव सांगितला आहे. यात तिने मुलाखतीत लग्नाविषयी कोण विचारतं म्हणत, अशा लोकांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तिने तिच्या एक्स पोस्टमध्ये सांगितले की, एका कंपनीच्या एचआरने तिला प्रथम तिचे वय विचारले, नंतर तिचे वय जाणून घेतल्यानंतर तिने लग्नाच्या प्लॅनबद्दल विचारण्यास सुरुवात केली. यानंतर जान्हवीने तिच्या पोस्टच्या माध्यमातून युजर्सना विचारले की, आताही असेच होत आहे का?
तिच्या म्हणण्यानुसार, मुलाखतीत आजही वयाच्या २५ नंतर लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारले जाते. एचआरच्या या प्रश्नावर सोशल मीडियावरील युजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एकीकडे लोक या प्रश्नावर टीका करत आहेत, तर दुसरीकडे काही युजर्सचे म्हणणे आहे की, हा फक्त एक प्रश्न म्हणून घेतला पाहिजे.
VIDEO : बाई असं वागणं बरं नव्हं! भरवर्गात शिक्षिका डाराडूर झोपली अन् विद्यार्थ्यांनी काय केलं पाहाच
@janwhyy नावाच्या एका एक्स युजरने लिहिले की, मला भारतातील एका कंपनीतील मुलाखतीत एचआरने विचारले, तुमचे वय किती? तेव्हा मी २५ वर्ष सांगितले, यावर एचआरने मला दुसरा प्रश्न केला की, तुम्ही लवकरात लवकर लग्न करण्याचा विचार करत आहात का? आजही असा प्रश्न विचारला जातो का?
आजकाल असेच घडतेय…
या व्हायरल पोस्टवर सोशल मीडिया युजर्सनीही लग्नाशी संबंधित प्रश्नांसह आपले मत व्यक्त केले आहे. एका व्यक्तीने लिहिले की, “खरे सांगू, वयाच्या २६ व्या वर्षी कंपनीच्या एचआरने मलाही हा प्रश्न विचारला होता. काहीवेळा ते दुर्भावनापूर्ण नसते, परंतु कामावर घेण्यापूर्वी फक्त त्यांना हे जाणून घ्यायचे असते.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “कंपनीचे नाव घ्या, त्यांनाही लाज वाटेल.” तिसऱ्या युजरने लिहिले की, “होय, आजकाल असेच होत आहे, लग्नामुळे कामावरून लक्ष विचलित होईल असे त्यांना वाटते.”