नोकरीच्या पहिल्या दिवशी कंपनीच्या एचआरशी आपली ओळख होते. एचआर विभागात जाऊन नोकरीवर रुजू झाल्याचा रिपोर्ट, सर्व प्रमाणपत्रांच्या प्रती आदी कागदपत्रे जमा करायची असतात. त्या विभागातील संबंधित अधिकारी तुम्हाला तुमची बसायची जागा, कंपनीचे नियम, वरिष्ठांचे नाव, हुद्दा, कंपनीविषयीची अधिकृत माहिती देतात. तुमच्या सुट्ट्या असो वा तुमच्या कामाबद्दलच्या तक्रारी किंवा पगार या संबंधित काही अडचणी आल्यास थेट एचआरला जाऊन भेटावे लागते. तर आज एचआरसंबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याच्या वागणुकीबद्दल एक इमेल शेअर केला आहे.

काही कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत, एका महिला कर्मचाऱ्याला इन्स्टाग्राम, नेटफ्लिक्स, अजीओ या शॉपिंग वेबसाइट आणि नोकरीसारख्या जॉब सर्चिंग प्लॅटफॉर्मचा वापर करताना पाहिले आणि एचआरकडे तक्रार केली आहे. एका लिंक्डइन युजरने या संबंधित एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तसेच या वर्तणुकीमुळे युजरच्या मैत्रिणीला मेलद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. एचआरने पाठवलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे लिहिले आहे की, “आमच्या लक्षात आले आहे की, तुम्ही तुमच्या नोकरीच्या जबाबदाऱ्यांशी संबंधित नसलेल्या वेबसाइट्स, विशेषतः इन्स्टाग्रामसारख्या ॲपला कंपनीच्या कामाच्या वेळेत अनेकदा वेळ घालवता. तसेच यासाठी स्वतःचा वैयक्तिक नाही तर कंपनीचा वेळ, वीज आणि इंटरनेट वापरत आहात. नेटफ्लिक्स, नौकरी (Naukri) आणि ३१ मे रोजी तर अजिओवर तुम्ही जवळजवळ सहा तास वेळ घालवला.

हेही वाचा…एकदाचा मिळाला! सात तासांची अथक मेहनत अन् महिलेला मिळाला आयफोन परत; पाहा शोध घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ‘हा’ VIDEO

पोस्ट नक्की बघा…

https://www.linkedin.com/posts/sumit-mishraa_one-of-my-friends-received-a-warning-from-activity-7203385533031526400-kvyO?utm_source=li_share&utm_content=feedcontent&utm_medium=g_dt_web&utm_campaign=copy

कामाच्या वेळेत वैयक्तिक अशा शरीराच्या हालचाली किंवा अशा चलनवलन प्रक्रियांबरोबर गुंतणे आमच्या अपेक्षांशी अजिबात जुळत नाही. तसेच कृपया लक्षात ठेवा, ड्युटीवर असताना मुलाखत पाहताना पकडले गेल्यावर आम्ही तुम्हाला मागील आठवड्यात एक नोटीससुद्धा दिली होती. तसेच कंपनीतील बऱ्याच सहकाऱ्यांनी असेही नोंदवले आहे की, वैयक्तिक वापरासाठी कर्मचारी कॉफीचे पाऊच, साखरेची पाकिटे, मॅगी, काटा-चमचा आणि डिस्पोजेबल प्लेट्ससुद्धा घरी घेऊन जात असते. हे सगळं मेसेजमध्ये नमूद करून नोटीस देण्यात आली आहे की, कृपया लक्षात ठेवा, कंपनीच्या मालमत्तेतून अशा गोष्टी चोरणे सक्त मनाई आहे; असे या मेसेजमध्ये स्पष्ट लिहिले आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट लिंक्डइन युजरच्या @Sumit Mishra या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून वापरकर्त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी ‘मैत्रिणीची चूक परवानगीशिवाय सार्वजनिकपणे हायलाइट केल्याबद्दल युजरची टीका केली.’ तर अनेक युजर्स म्हणाले, ‘मला कामावर असे मित्र कधीच मिळू देऊ नको.’ तर काही युजर्स असेदेखील म्हणाले की, ‘कदाचित वैयक्तिक वेळ आणि कामाचा समतोल कसा साधायचा हे समजून घेण्याची तिला एक संधी द्यावी’; असे युजर कमेंटमध्ये व्यक्त होताना दिसले आहेत.