Boa Constrictor Snake Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. एरव्ही रानावनात, गवतात सरपटणारा साप विमानतळावर चक्क महिलेच्या बॅगमध्येच सापडल्याने खळबळ उडालीय. अमेरिकेच्या टाम्पा आंतराष्ट्रीय विमानतळावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सुरक्षा रक्षकांना चार फुट साप दिसल्याने धक्काच बसला आहे. बॅगेची तपासणी सुरु असताना सुरक्षा रक्षकांनी मोठा साप बॅगेत असल्याचं पाहिलं. साप समोर दिसल्यावर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो आणि एका महिलेच्या बॅगमध्येच साप सापडल्याने विमानतळावर सुरक्षा रक्षकांना धक्काच बसला. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही अवाक झाले आहेत.
विमानतळावर महिलेच्या बॅगेत चार फुटी साप सापडला अन् एकच खळबळ उडाली
टीसीएने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या टाम्पा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी अशा महिलेला पकडलं होतं, ज्या महिलेच्या बॅगेच चक्क चारफुटी साप विळखा घालून बसला होता. या गंभीर प्रकाराचा व्हिडीओ ट्रान्सपोर्टेशन सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेशनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सुरक्षा रक्षकांनी तपासणी दरम्यान केलेल्या एक्स रे फोटोचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. बॅगेत बूट, लॅपटॉप आणि अन्य सामानसह मोठा सापही असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. महिलेच्या बॅगेत भला मोठा मांडूळ साप सापडल्याची माहिती समोर आली आहे. मांडूळ साप हा बिनविषारी साप असून तो शरीराला घट्ट विळखा घालून इतर प्राण्यांची शिकार करत असतो.
इथे पाहा व्हिडीओ
टीएसए अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना मागच्या महिन्यात १५ डिसेंबरला घडली होती. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, या बॅगेत एक डेंजर न्यूडल आहे…महिलेच्या बॅगेत मांडूळ साप बसला होता. एक्सरे मशीनमधून बाहेर निघाल्यावर प्राण्यांना पकडण्यासाठी आमच्याकडे काहीच नाहीय. तसंच विमान प्रवास करण्याआधी प्रवाशांनी पाळीव प्राण्यांच्या नियमावलीचे पालन करण्याचं आवाहनही या पोस्टच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी केलं आहे. सापांना प्रवासादरम्यान सोबत ठेवण्याची परवानगी नसल्याचं नियमावलीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण काही विमानतळावर त्यांना चेक इन बॅघमध्ये नेण्यास परवानगी दिली जाते. त्यांची सुरक्षीतता तपासली जाते.