रणरणत्या उन्हाळ्यानंतर पाऊस सुरू झाला की पाणी, हिरवळ आणि डोंगरप्रेमी पर्यटक व ट्रेकर… त्यातही नवाट ट्रेकर मंडळींच्या इच्छा आणि पावलांना धुमारे फुटतात. इतरांचे ट्रेकचे फोटो, धबधब्यातील, जंगलातील, डोंगरातील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की येतील तो शनिवार रविवार ट्रेक, अॅडव्हेंचर करावंस वाटतं. अनेक धंदेवाईक मंडळी ही संधी लुटण्यास डोळे झाकून पुढे सरसावतात आणि इथून पुढे खरा धोका सुरू होतो.अनेकांनी या विकेंडला ट्रेंकींगला जाण्याचे प्लॅ केले असतील,मात्र त्या आधी कळसुबाई शिखरावर रविवारी पर्यटकांची झालेल्या कोंडीचा हा व्हिडीओ पाहा. कळसुबाईवर ट्रेकर्सच्या गर्दीचा हा व्हिडीओ बघून तुम्ही विकेंडचा प्लॅन नक्की कॅन्सल कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे शिखर आहे. पावसाळा सुरू झाली की पर्यटकांची आणि गिर्यारोहकांची अफाट गर्दी कळसुबाईवर होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कळसुबाईवर पर्यटक, ट्रेकर्सची इतकी गर्दी आहे की कितीतरी वेळ सर्वजण एकाच ठिकाणी उभे आहेत. अक्षरशः पाऊल ठेवायला जागा देखील नसल्याचं या व्हिडिओ मधून समोर आलेले आहे. सुदैवाने या घटनेत चेंगराचेंगरी झालेली नाही. असंच चित्र दरवर्षी बघायला मिळतं गडाच्या पायथ्याशी किंवा गडावरती योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर पोलीस देखील अशा ठिकाणी असणे गरजेचे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – लोणावळ्यातील लोहगडावर प्रचंड गर्दी; चार तास पर्यटक अडकून पडले; सुदैवाने चेंगराचेंगरी झाली नाही…

जुन ते ऑगस्ट कालावधीत तुम्ही ट्रेक करू इच्छित असाल,पावसाळ्यामध्ये सह्याद्रीत भटकंतीला जावू इच्छित असाल तर विकेंडला कधीही प्लॅनिंग करु नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge crowd at kalsubai igatpuri akole trekking spots near mumbai pune visit these forts if you are going for trekking in monsoon srk