अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Huge Octopus Climbs On Car Video: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या व्हिडिओ मध्ये एक महाकाय ऑक्टोपस लोकांच्या गाडीवर चढत असल्याचे दिसत आहे. न्यूयॉर्क शहरात आलेल्या पुराच्या दरम्यान हा ऑक्टोपस पाहायला मिळाला होता असेही दावे अनेकजण व्हिडीओ व्हायरल करताना करत आहेत. महाकाय प्राण्यांच्या प्रजातीविषयी लोकांना अनेकदा कुतूहल असतेच पण नेमका हा प्रकार काय याविषयी सविस्तर तपास पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Aldrich ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

https://x.com/observer888888/status/1707808970377932850

अन्य यूजर्स देखील हा व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही आमचा तपास ट्विटर वर किवर्ड सर्च पासून सुरु केला. आम्ही, ‘जायंट ऑक्टोपस’ असे ट्विटर वर शोधताच आम्हाला खरा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ ट्विटर यूजर ‘ght’ यांनी शेअर केला होता.

व्हायरल आणि खऱ्या दोन्ही व्हिडिओ मध्ये एक वॉटरमार्क पाहायला मिळतो, त्यांत ‘@ghost3dee’ असे लिहिलेले आहे.

कॅप्शन मध्ये म्हटले होते: जेव्हा तुम्ही मुर्खासारखी गाडी पार्क करता तेव्हा एक महाकाय ऑक्टोपस येऊन तुम्हाला असा धडा शिकवतो.
@Audioflagstudio . #houdini #simulation #cgi #vfx #vellum

त्यानंतर आम्ही यूजरचा बायो तपासला आणि आम्हाला त्यांची इंस्टाग्राम लिंक, Alex Z या नावानी सापडली. आम्हाला हा व्हिडिओ देखील त्यांच्या प्रोफाइलला पिन केलेला सापडला.

हा व्हिडिओ Snap Renderfarm वापरून बदलण्यात आला होता.

https://snaprender.farm/

स्नॅप रेंडरफार्म डिझायनर हे आर्किटेक्ट, अॅनिमेटर्स, मोशन डिझायनर आणि 3D ग्राफिक्समध्ये वापरले जाते. या प्रोग्रॅमचे ध्येय 3D कलाकृती साकारताना तांत्रिक गरजांसाठी वाट पाहात राहण्यापेक्षा क्रिएटिव्हिटीला जास्त वेळ देता यावा हे आहे. खरा व्हिडिओ क्रिएटर द्वारे २५ सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता.

” या व्हिडिओचे निर्माते अॅलेक्स ज़ी यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ते म्हणाले की, “हा तोच ऑक्टोपसचा व्हिडिओ आहे जो मी २०२० मध्ये बनवला होता आणि तो तेव्हा व्हायरल झाला होता, फक्त तेव्हा एक वेगळी परिस्थिती होती. माझा व्हिडिओ घेण्याकडे लोकांचा कल असतो आणि लोकांना गोंधळात टाकणारे वेगवेगळे दिशाभूल करणारे कॅप्शन त्याला जोडण्यात येतात. माझे व्हिडीओ अनेकदा चोरी होतात पण मूळ व्हिडिओ तपशीलवार वर्णनासह इंस्टाग्रामवर आहे.

“हिंदू अधिकाऱ्यांकडून सतत अपमान म्हणूनच..” , IAF कर्मचाऱ्यांच्या नावे पोस्ट पाहून नेटकरी भडकले; शेवटी वायुदलाने..

निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ ज्यात एक महाकाय ऑक्टोपस एका कार वर चढताना दिसतो, तो व्हिडिओ खोटा आहे. हा व्हिडिओ न्यू यॉर्क मध्ये आलेल्या पुराचा नसून, स्नॅप रेंडरफार्म वापरून रेंडर करण्यात आला आहे.