गेल्या काही दिवसांपासून साप आणि अजगराच्या बाबतीत अनेक मजेशीर किस्से सोशल मीडियावर पाहायला मिळाले. कोणाच्या घरात ख्रिस्मस ट्रीवर विषारी साप पाहायला मिळाले तर कोणाच्या लेटरबॉक्समध्ये अजगराने थाटलेल्या संसाराचे फोटो व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी विमानात देखील साप आढळल्याने प्रवाश्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती, याचीही सोशल मीडियावर चर्चा झाली. पण आता असाच काहिसा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण यावेळी अजगर घर किंवा विमानात नाही तर चक्क एका गाडीच्या इंजिनात लपून बसलेला पाहायाला मिळाला.

VIRAL VIDEO : लेटर बॉक्समध्ये दडून बसला विषारी पाहुणा

थायलँडमधला हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये १२ फूटांचा अजगर गाडीच्या इंजिनात थाण मांडून बसलेला दिसून येत आहे. या अजगरामुळे चालकाला काही आपली गाडी चालवता येईना. या अजगराला गाडीच्या इंजिनातून बाहेर काढण्यासाठी त्याने प्रयत्न केले, पण अजगराला काही आपली जागा सोडवेना. अखेर त्याने सर्प मित्रांना बोलावले. पण त्यांनाही काही हा अजगर दाद देईना. अखेर प्रयत्नांची पराकष्टा करत या अजगराला गाडीच्या इंजिनमधून सर्पमित्रांनी बाहेर काढले. अजगराची ही गंमत पाहण्यासाठी सगळ्यांनी गाडीभोवती गर्दी केली होती. काहींना तर साप गारूड्यांचा हा खेळ कॅमेरात कैद करण्याच्या मोहही अनावर झाला. याचा व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : गुहागरच्या समुद्रात सापडले उडणारे मासे!

VIDEO : ६ वर्षांनंतर रहस्यमयी शार्क माशाचा व्हिडिओ प्रदर्शित

Story img Loader