Metro Viral Video: आपण ऑफिसमध्ये दमून आल्यावर ट्रेनमध्ये समजा कधी बसायला जागा मिळाली तर पहिला विचार डोक्यात येतो की जरा काही क्षण झोप काढावी. अर्थात गर्दीत ते शक्य होईलच असं नाही. अगदी मानेशी येऊन उभे राहिलेले प्रवासी तुमची झोपमोड होईल याची पूर्ण खात्री करतात. अशाच एका सहप्रवाश्याने मेट्रोमधून जाणाऱ्या तरुणाला झोपेतुन खडबडून जागे केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की हा सहप्रवासी म्हणजे माणूस नव्हे तर चक्क एक उंदीर आहे. मेट्रोमध्ये झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरावर हे उंदीर मामा दुडूदुडू धावू लागले ज्याने त्या व्यक्तीची झोपमोड झाली आणि मग जे झालं ते बघून मेट्रोतील प्रवासीच नव्हे तर नेटकरीही थक्क झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये उंदीर माणसाच्या पायावर चढताना दिसत आहे. पण हा माणूस कदाचित इतका थकलेला होता की त्याला झोपेत जाणवतही नाही मग उंदीर त्याच्या खांद्यावर जातो. हे सगळं सुरु असताना इतर प्रवाशांच्या आवाजाने हा झोपलेला माणूस जागा होता आणि त्याला शरीरावर हालचाल जाणवू लागते.यावेळी उंदीरही अलर्ट होतो आणि त्याच्या मानेवर जाऊन बसतो, एक दोन सेकंद तर दोघांमध्ये लपाछपी सुरु राहते आणि मग उंदीर मामा एका हातावरून खाली उतरतात. जसा हा माणूस उभा राहतो उंदीर घसरगुंडीसारखा अंगावरून खाली उतरून पुन्हा लपायला निघून जातो.

Viral Video पाहा

हे ही वाचा<< …आणि तो ठरला मित्रांचा अखेरचा संवाद! सहाव्या मजल्यावरून कोसळला तरुण, Video पाहून उडेल थरकाप

शनिवारी शेअर केल्यापासून, या व्हिडिओला ट्विटरवर जवळपास दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या प्रवाशाच्या शांत प्रतिक्रियेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. मी या जागी असतो तर उड्या मारल्या असत्या असेही काही जण म्हणाले आहेत. हा व्हिडीओ न्यूयॉर्क मेट्रोमधील असल्याचे कॅप्शनवरून समजत आहे.

Story img Loader