सध्या सोशल मीडियावर अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला पर्यटक समुद्र किनारी असणाऱ्या खडकावर फोटो काढण्यासाठी उभी होती. यावेळी आलेल्या लाटेच्या तडाख्याने ही महिला बाहेर फेकली गेली. Shanghaiist च्या मते हा व्हिडिओ इंडोनेशियाच्या नुसा लेम्बोंगनच्या डेविल्स टीयर बेटावरील आहे. लाटेच्या तडाख्यामुळे वाहून गेलेली महिला सुदैवानं सुरक्षित असल्याचे समजत आहे.
花季少女,巨浪吞噬,命懸一線 pic.twitter.com/qTo7vDyDRu
आणखी वाचा— 人民日報 People's Daily (@PDChinese) March 17, 2019
डेविल्स टियरवर ही महिला टायटॅनिक पोज देऊन फोटो काढण्यासाठी उभी होती. मात्र फोटो काढण्याचा मोह तिला चांगलाच भोवला. समुद्रातील खडकांवर उभी राहून फोटो काढण्यात मग्न असणाऱ्या या महिलेला लाटेचा अंदाज आला नाही. मागून मोठी लाट आली लाटेच्या तडाख्यामुळे ही महिला बाजूला फेकली गेली.
सुदैवाने ही महिला सुरक्षित असून तिला किरकोळ इजा झाल्या आहेत. बालीच्या एका इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. समुद्राजवळची जागा धोक्याची असते, त्यामुळे लोकांनी फोटोसाठी धोका पत्करू नये असं आवाहन या व्हिडिओद्वारे करण्यात आले आहे. डेविल्ड समुद्र किनारा इंडोनेशियातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे हजारो लोक समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी येतात.