‘प्लेबॉय’ या जगप्रसिद्ध मासिकाचे जनक ह्यू हेफनर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. मासिकातील नग्न छायाचित्रे, सेक्स आणि अशाच काही विषयांवरील लेख, चर्चा, मुलाखती यामुळे हे मासिक तुफान गाजलं. १९५३ मध्ये ह्यू हेफनर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. खरंतर त्याकाळात असं मासिक सुरु करणं म्हणजे मोठ्या धाडसाचं म्हणावं लागेल. हे मासिक वादात सापडलं पण जगात कोणत्याही मासिकाला गाठता येणार नाही, इतके खपाचे शिखर प्लेबॉयने गाठले. प्लेबॉयमुळे ह्यू हेफनर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.
हेफनर यांची जीवनशैली देखील त्यावेळी प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरली. त्याकाळी ह्यू हेफनरच्या प्रायव्हेट जेटची जोरदार चर्चा होती. काळ्या रंगाचे आणि त्यावर प्ले बॉय बनीचे मोठ चित्र असलेलं हेफनर यांचं जेट विमानतळावर सर्वात उठून दिसायचं. १९६० मध्ये त्यांनी ते खरेदी केलं होतं. या विमानाला ‘बिग बनी’ नावाने ओळखलं जायचं. विमानाला मनासारखी रंगरंगोटी करण्यासाठी त्यांना खास अमेरिकी सरकारकडून परवानगीही मिळाली होती. त्याच्या या आलिशान विमानाची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची.
वाचा : ‘प्लेबॉय’चे साहित्यिक गोमटेपण
याविमानात हेफनर यांच्यासाठी अलिशान खोली तयार करण्यात आली होती. त्याकाळी त्यांच्या मनोरंजनासाठी मोठं सिनेमागृह, डिस्को देखील उभारलं होतं. अगदी हेफनरसाठी महागड्या फरपासून तयार केलेल्या गाद्या आणि सेवेला अनेक सौंदर्यवती देखील होत्या. हेफनर यांच्या अलिशान जेटमध्ये त्याकाळी अनेक बड्या लोकांच्या पार्ट्या रंगायच्या. पण फक्त पार्टीसाठी नाही तर व्हिएतनाम युद्धाच्यावेळी देखील दिलदारपणे हेफनर यांनी आपलं अलिशान विमान वापरायला दिलं होतं. याविमानातून ४० अनाथ मुलांना त्यावेळी व्हिएतनामधून अमेरिकेत आणलं गेलं.
Viral : ..म्हणून बॉसने कर्मचाऱ्याला चिकटपट्टी लावून भिंतीवर टांगले