सोशल मिडियावर सध्या न्यूज २४ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन नेटकरी चांगलेच संतापले आहेत. वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये एका चर्चेमध्ये सहभागी झालेल्या पंडित अजय गौतम यांनी मुस्लीम अँकरला पाहिल्यावर हातांनी आपले डोळे बंद करुन घेतले. ‘हम हिंदू’ या संस्थेचे संस्थापक असणारे अजय गौतम हे एका चर्चेसाठी तज्ज्ञ म्हणून कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. अँकरचे नाव सऊद मोहम्मद खालिद असून तो मुस्लीम असल्याचे समजल्यानंतर गौतम यांनी आपल्या डोळ्यांवर हात ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये न्यूज २४ चे वरिष्ठ संपादक संदीप चौधरी चर्चेचा कार्यक्रम संपवताना, ‘आता आमचा अजून एक खास कार्यक्रम पाहा खालिदसोबत. खालिद.. अजय गौतम तुला नाही पाहणार. तुझं नाव खालिद असल्याने त्यांनी डोळ्यावर हात ठेवला आहे. पण तू बोल तू यांची चिंता करु नकोस’ असं सांगताना दिसतात.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लोकांनी पंडित अजय गौतम यांना या व्हिडिओवरुन चांगलेच ट्रोल केले आहे. अनेकांनी छोटी मानसिकता असणाऱ्या अशा लोकांना वृत्तवाहिन्यांनी चर्चेसाठी बोलवू नये असं मत व्यक्त केले आहे.

दरम्यान वृत्तवाहिनीने या पुढे अजय गौतम यांना कधीच आमंत्रित केले जाणार नसल्याची माहिती वृत्तवाहिनीशी संबंधित असणाऱ्या अनुराधा प्रसाद यांनी ट्विट करुन दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झोमॅटोचा डिलेव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर रद्द करण्यावरुन सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. ती चर्चा कुठे शांत होत नाही तोच आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीची चर्चा या व्हिडिओमुळे सुरु झाली आहे.