Mumbai Video : मुंबई शहर हे एक असं शहर आहे, या शहरात अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातात. त्यामुळे या शहराला स्वप्ननगरी सुद्धा म्हणतात. या शहराने प्रत्येकाला काही ना काही दिले आहे. आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे अनेकांना आपले वाटते. सोशल मीडियावर अनेक जण मुंबई शहराविषयी आणि तेथील लोकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक मुंबईत काय आहे, यावर बोलताना येथील एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाविषयी सांगतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुण एक किस्सा सांगतात. मुंबईचा रिक्षाचालक हरवलेला फोन कसा परत आणून देतो, हे तुम्हाला या व्हिडीओतून समजेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला दोन तरुण दिसतील. त्यातला एक जण म्हणतो, “मुंबईत असं काय आहे, धावपळीचं आयुष्य” तर दुसरा तरुण म्हणतो, “मुंबईत प्रामाणिकपणा आहे.” त्यानंतर त्यातला एक तरुण एका माणसाकडे कॅमेरा फिरवत सांगतो, “यांचा फोन हरवला होता.” त्यानंतर तो पुन्हा कॅमेरा फिरवतो आणि रिक्षाचालकाकडे वळवतो आणि म्हणतो, “यांनी तो परत आणून दिला. त्यानंतर रिक्षा चालक सांगतो, “यांनी मला फोन केला आणि मी त्यांना फोन परत द्यायला आलो.” त्यानंतर तरुण फोन परत मिळालेल्या व्यक्तीला विचारतो, “तुम्हाला कसं वाटतं?” त्यावर ती व्यक्ती म्हणते, “अप्रतिम, खूप प्रामाणिक लोक आहेत.”
त्यानंतर दुसरा तरुण कॅमेऱ्यासमोर येतो आणि म्हणतो, “हे मुंबईचे रिक्षाचालक आहे. कधी कोणाबरोबर फसवणुक करणार नाही. तुमचा फोन तुम्हाला परत मिळाला सर. त्यामुळे मुंबईला कधीही चुकीचं समजू नका. मुंबई खूप छान आहे.” त्यानंतर तो रिक्षाचालकाचे नाव विचारतो. रिक्षाचालक म्हणतो, “सुरेंद्रसिंग” त्यानंतर पुढे तरुण रिक्षाचालकाला म्हणतो, “सर तुम्ही जे काम केले ते माणुसकीला
धरून काम केले. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. शेवटी एक दुसरा तरुण कॅमेऱ्यापुढे येतो आणि म्हणतो, “याच कारणामुळे मला मुंबई आवडते.”

Biker dies after being hit by PMP bus on nagar road
पुणे : नगर रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

पाहा व्हायरल व्हिडीओ

simplysid08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुंबईच्या रिक्षाचालकांसाठी खूप आदर आहे.”

हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही गोष्ट खरी आहे. मुंबईचे लोक खूप मदत करतात.” तर एक युजर लिहितो, “माझा फोन सुद्धा असाच हरवला होता आणि मला पण सायंकाळ पर्यंत परत मिळाला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुंबईत खरंच माणुसकी आहे.” एक युजर लिहितो, “याच कारणामुळे मला मुंबई खूप आवडते.” तर एक युजर लिहितो, “”मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये मुंबई शहराविषयी प्रेम व्यक्त केले आहेत.

Story img Loader