हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे” ही प्रार्थना तुम्हाला माहिती असेल. उंबटू चित्रपटातील हे गीत तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ही प्रार्थना ऐकल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातील माणुसकीची जाणीव करून देते. या प्रार्थनेतून जर काही शिकण्या सारखे असेल ती म्हणजे माणुसकी. आपल्यामधील माणुसकी टिकवता आली तर हे जग नक्कीच एक दिवस सुंदर होईल. सध्या सोशल मीडियावर असे माणुसकीचे दर्शन घडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण भुकेल्या श्वानाची मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
व्हायरल व्हिडीओ sohams नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते एक तरुण रहदारीच्या रस्त्यावर फुटपाथवर बसला आहे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडे पाहत आहे. त्याच्या बाजूला बिस्किटचा पूडा ठेवला आहे आणि त्याती एक बिस्कीट जमिनीवर ठेवले आहे. तिथे एक श्वान देखील आहे. भुकेला श्वान बिस्किटाजवळ जाऊ वास घेतो पण खात नाही. तो त्या तरुणाच्या पलीकडे जाऊन बसतो. त्यानंतर थोड्यावेळाने तरुणाच्या समोर येऊन उभा राहतो. तरुण त्या श्वाला सर्व बिस्केटा काढून तुकडे काढन खायला देतो. हे पाहून श्वान त्या तरुणाकडे प्रेमाने पाहतो अन् त्याच्या जवळ जातो.”
हेही वाचा – “थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral
हे सर्व दृश्य कोणीतरी दुरून कॅमेऱ्यामध्ये कैद करून आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओला “माणसाने माणसाशी माणसासम वागणे”हे गीत जोडले आहे. व्हिडीओमध्ये श्वानाचे नाव स्विगी असल्याचे सांगितले आहे. व्हिडीओवर नेटकऱ्याने कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले ,”तिचे नाव swiggy आहे ती फक्त प्रेम व्यक्त करते आणि तिच्यावर प्रेम व्यक्त करण्याचा पर्याय म्हणजे दूध किंवा बिस्किटे घेते” दुसऱ्याने लिहिले की, “खूप मस्त व्हिडिओ ..!” तिसरा व्यक्ती म्हणतो, “माणसाने माणसाशी आणि इतरांशी देखील माणसासम वागणे गरजेचे आहे” काही जण त्या तरुणाचे कौतूक करत म्हणतात,”तरुणावर चांगले संस्कार केले आहेत”