फक्त प्राणीच चार पायांवर का चालतात? माणसं त्यांचे हात आणि पायांवर का चालत नाहीत? तुमची मुलंही असे प्रश्न नक्कीच विचारत असतील, तर माणसं दोन पायांवर कशी चालतात असा विचार कदाचित प्राणीही करत असतील; पण तुम्ही कधी एखाद्या माणसाला प्राण्यासारखं चालताना पाहिलं आहे का? लहानपणी आपण सगळेच रांगतो; पण आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत जे हुबेहुब मेंढ्यांसारखे दिसतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित. पण हे खरंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मेंढ्या आणि माणसं यांच्यात फरक करणं अवघड जाईल.
सोशल मीडियावर सध्या मेंढ्यासारखे दिसणाऱ्या लोकांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये माणसं हुबेहूब मेंढ्यांसारखं चालतात. इतकंच काय तर मेंढ्यांसारखा ‘बा-बा’ असा आवाज सुद्धा काढतात. यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले तर तुम्हाला मेंढी कोण आणि माणसं कोण यात फरक करणं खूप अवघड जाईल. त्यांचे हे मेंढ्यासारखे हावभाव पाहून काही वेळासाठी ती खरोखर मेंढी आहे, असा भास होईल. मेंढ्यासारखे दिसणारे हे लोक कुंपण बांधलेल्या जागेवर इकडून तिकडे फिरताना दिसत आहेत. या लोकांच्याही अंगावर अगदी मेंढ्यासारखे केस दिसून येत आहेत.
आणखी वाचा : VIRAL : सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करणारी ‘ती’ वकील महिला नक्की कोण? ३ महिन्यांपूर्वीच भाड्याने घर घेतलं होतं…
हा व्हिडीओ पाहून नक्की काय प्रकार आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला. तर या व्हिडीओसाठी तुमची उत्सुकता न वाढवता जाणून घेऊ नक्की काय आहे हा व्हिडीओ? खरं तर या व्हिडीओमध्ये काही लोकांनी मेंढ्यासारखी वेशभूषा परिधान केलेली आहे. मेंढ्यांच्या वेशभूषेतील अनेक माणसे मेंढ्यांच्या चालण्याची नक्कल करण्याच्या विचित्र प्रयत्नात अर्धे वाकून चालताना दाखवले. हा व्हिडीओ फ्रान्समधला आहे. इथल्या टोरंटो आधारित नृत्य कंपनी कॉर्पसचे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनातील विनोदी नृत्यदिग्दर्शन लोकप्रिय आहे. यावेळी शीप ह्यूमन कॉन्टेस्ट नावाची एक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी होत लोकांनी मेंढ्याच्या वेशभूषेत आपली कला सादर केली.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेटकऱ्यांनी शोधली रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटातील मोठी चूक, तुम्ही पाहिली का?
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : दुधाने मुलीचे पाय धुतले आणि तेच दुध प्यायले, बाप-लेकीच्या नात्याचा हा गोंडस VIRAL VIDEO पाहाच
या स्पर्धेतील मेंढ्यांच्या वेशभूषेतील लोकांचा व्हिडीओ emikusano नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत ८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक सुद्धा केलंय. लोक या स्पर्धेबाबत आपलं वेगवेगळं मत व्यक्त प्रतिक्रिया शेअर करत आहेत.