Viral Video From Animal Zoo: जंगलात राजे म्हणून जगणारे प्राणी माणसाने आपल्या करमणुकीसाठी पिंजऱ्यात आणून ठेवले.. इतकंच नव्हे तर त्यांना बघण्यासाठी पैसे लावून निसर्गाच्या निर्मितीचाच व्यवसाय केला. मात्र हे दुःखद वास्तव बदलणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तानसू येगेन (Tansu YEĞEN) या ट्विटर युजरने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला एक अनोखं प्राणी संग्रहालय पाहायला मिळत आहे. यात प्राण्यांऐवजी चक्क माणसांना कैद करून ठेवण्यात आले आहे तर एखाद्या जंगलात फिरावे असे प्राणी बिनधास्त फिरताना दिसत आहेत.

चीनच्या चोंगकिंग शहरातील लेहे लेडू वन्यजीव प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना मुक्तपणे फिरता येते तर त्यांना बघायला येणाऱ्या पर्यटकांना पिंजऱ्यात बंद केले जाते. आपण व्हायरल व्हिडीओ मध्ये पाहू शकता की वाघ, सिंह, अस्वल यांसारखे वन्य प्राणी अगदी निवांत फिरत आहेत काही जण तर चक्क या माणसांना कैद करून ठेवलेल्या पिजर्यावर निवांत पहुडलेले सुद्धा दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या कुतुहुलाने माणसे त्या प्राण्यांना बघतायत त्याच उत्सुकतेने हे प्राणी सुद्धा पिंजऱ्यात अडकलेल्या माणसांना बघत आहेत. काही जण प्राण्यांना मांस खायला देताना सुद्धा दिसत आहेत.

तानसू येगेन (Tansu YEĞEN) यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना “हे मानवी प्राणीसंग्रहालय आहे जिथे प्राणी पिंजऱ्यात धोकादायक माणसाला पाहू शकतात” असे कॅप्शन दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माणसांच्या संग्रहालयाचा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडिओला आठ लाखाहून अधिक व्ह्यूज व ५००० हुन अधिक रिट्वीट आहेत. काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांना हे साहस नक्की करायला आवडेल. तुम्हाला या अनोख्या संकल्पनेबाबत काय वाटतं नक्की कळवा.