उन्हाची तीव्रता आता वाढू लागलीय, वाढत्या उन्हामुळे पाणीसाठे कमी होत आहेत. आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही या उन्हाचा फटका बसतो. वातावरणात होणाऱ्या तापमान वाढीचा त्रास मनुष्यासह पक्षी, प्राण्यांनाही होत आहे. थोडंसं चाललं तरी आपल्याला धाप लागते. आपल्यालाच एवढा त्रास होत आहे तर प्राणी-पक्षांना या रखरखत्या उन्हाचा किती त्रास होत असेल.त्यामुळे हे पक्षी उन्हाळ्यात पाणवठ्यांजवळ थंडाव्यात वावरतात. या कडाक्याच्या उन्हात मनाला थंडावा देणारा, एका पक्षाचा व्हिडिओसमोर आला आहे.
कारंज्यावर एक हमिंग बर्ड पाण्याच्या उडणाऱ्या थेंबांवर आरामाच उडताना आणि त्याची मजा घेताना दिसत आहे. या पक्ष्याकडे पाहून असं वाटतं की, कारंज्यावर उडणाऱ्या पाण्याच्या थेंबांमध्ये उडत ओलं होऊन तो आपलं मन शांत करत आहे. अशा प्रकारे स्वतःला रिफ्रेश करणं या पक्षाला आवडत आहे. उन्हाळ्यात हा पक्षी या गारव्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. आपण जसे पावसात भिजतो,
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: मगरीच्या पिल्लावर चाकूने करत होता हल्ला, मात्र मगरीनं क्षणात इंगा दाखवला अन्…
पक्ष्यांसाठी तुम्ही काय कराल ?
- उन्हाळ्यात मटण किंवा चिकनसारखे गरम खाद्यपदार्थ म्हणून देऊ नयेत
- घर किंवा इमारतीवर पाण्याची भांडी भरून ठेवावीत.
- पाण्यात ग्लुकोज टाकल्यानं पक्ष्यांसाठी फायदेशीर ठरेल.
- पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत
- उन्हाळ्यात पक्ष्यांची घरटं तोडू नका.
- कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावीत
- पक्षांना खाऊ म्हणून दाणे ठेवावेत. तेलकट पदार्थ टाळावेत.