ट्रेनने अनेक लोक प्रवास करतात. अनेकांच्या धावपळीच्या जीवनाची सुरुवात ही रेल्वेने होते. खिशाला परवडणारी व सहज सोपी अशी वाहतूक म्हणजे रेल्वे. प्रवाशांची लाइफलाइन असलेल्या या रेल्वेने रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. सोशल मीडियावरही रेल्वेशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुणी काहीतरी स्टंट करतं, तर कधी कुणाचा अपघात होतो. असे अनेक व्हिडीओ असतात; जे बघून आपल्याला धक्का बसतो. काही व्हिडीओ तर लोकांच्या अक्षरशः जीवावर बेतणारे असतात. बरेचदा तर यावर रेल्वे पोलिसच कारवाई करतात. लोकसुद्धा विशेषतः तरुण मंडळी प्रसिद्धीसाठी वाटेल ते व्हिडीओ बनवितात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वेळा असे घडते की, थोड्याशा निष्काळजीपणामुळे लोक रेल्वे रुळाखाली येतात आणि आपला जीव गमावतात. पण, आज आम्ही तुम्हाला जे दाखविणार आहोत आणि सांगणार आहोत त्यात प्रकरण थोडे वेगळे आहे. या अनोख्या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरुवातीला तुम्ही व्हिडीओ पाहून थोडे अस्वस्थ व्हाल; पण काही काळ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक आनंददायी हास्य नक्कीच दिसेल.

(हे ही वाचा : पाकिस्तानी तरुणीचा ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हायरल VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन )

नेमके काय घडले?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सर्व प्रवाशी रेल्वेच्या प्रतिक्षेत दिसत आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर येताच सर्व लोक ट्रेनमध्ये चढू लागले. चढता चढता एका व्यक्तीचा पाय घसरला आणि त्याचा पाय प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. ती व्यक्ती आपला पाय काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते; मात्र त्याला अडकलेला पाय काढता येत नाही. त्या माणसाला अडचणीत पाहून दुसरा प्रवासी मदतीला येतो. तो इतर लोकांनाही मदतीसाठी इशारा करतो. त्यानंतर काही वेळातच १०० हून अधिक लोक मदतीसाठी पुढे येतात आणि सर्व जण मिळून ट्रेनला धक्का देऊ लागतात. लोकांच्या ढकलण्यामुळे ट्रेन थोडी वाकडी होते. त्यानंतर ती व्यक्ती आपला पाय बाहेर काढते.

येथे पाहा व्हिडिओ

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘सच कडवा है’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स लोकांच्या एकजुटीचे कौतुक करीत आहेत. एका युजरने कमेंट करीत म्हटले, “ही एकतेची शक्ती आहे.” दुसऱ्याने लिहिले, “जर आपण एकत्र काम केले, तर आपण हे जग सर्वोत्तम स्थान बनवू शकतो.” तिसऱ्याने लिहिले, “संघटनेत ताकद आहे.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hundreds of passengers gathered to help a person whose leg got stuck between the platform and the train video viral pdb
Show comments