Viral video: आयफोन १५ च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. परराज्यातले नागरिक मुंबईत खरेदीसाठी दाखल झाले आहेत. तर, दिल्लीतही आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. दिल्लीतही आयफोन खरेदीसाठी ग्राहकांचा गोंधळ पहायला मिळाला. मात्र सध्या एका लांब सडक रांगेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र ही रांग आयफोनच्या खरेदीसाठीची नाहीतर एका वेळेच्या अन्नासाठीची आहे. एकीकडे आयफोन १५ साठी वाट बघणारे आणि दुसरीकडे एका वेळेच्या जेवणाचीगी भ्रांत असणारे हे चिमुकले. मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता, वाळवंटातील लहान मुलांची हातात ताट घेऊन अन्न घेण्यासाठी लांबच लांब रांग लागल्याचं दिसत आहे. तर एक व्यक्ती भात, भाजी आणि एक कोल्डड्रिंक वाटत आहे. हे चिमुकले संयमाने या रांगेत आपल्या एक वेळच्या अन्नासाठी थांबल्याचं आपल्याला दिसत आहे.
एकीकडे अन्नासाठी लहान मुलांच्या रांगा आणि दुसरीकडे आयफोन घेण्यासाठी लागलेल्या रांगा, जगातील ही दोन दृश्ये आपल्याला विचार करायला भाग पाडतील. एकीकडे एकवेळच्या अन्नाची भ्रांत आणि दुसरीकडे अलीशान जगण्यासाठी उडवले जाणारे पैसे हे चित्र नक्कीच विचार करण्यासारखं आहे.
“हे आयफोन विकणारे लोकच जग चालवतात”
“२ भागात जग विभागले आहे.. पहिल्या भागात जेवणासाठी रांगेत उभी असलेली भुकेलेली मुले… तर दुसरीकडे आयफोन १५ खरेदीसाठी रांग लागली आहे. संपूर्ण जग भारतासारखे विषमतेच्या दलदलीत बुडाले आहे. हे आयफोन विकणारे लोकच जग चालवतात. ते ब्रेड रोल करत नाहीत आणि खातही नाहीत. ते फक्त भाकरी खाणार्याशीं खेळतात.” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
हा व्हिडीओ व्हायरल होत असून खरंच विचार करायला भाग पाडत आहे.
१२ सप्टेंबरला लाँच झाली आयफोन- १५ सिरीज
आयफोन- १५ सिरीज १२ सप्टेंबरला लाँच झाली. apple event मध्ये आयफोन- १५ सिरीज लाँच करण्यात आली. आयफोन १५ सीरिजमधले ४ मॉडेल्स लॉन्च करण्यात आले आहेत. आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स असे हे मॉडेल आहेत.