सापाचे तुम्ही आजवर बरेच व्हिडीओ पाहिले असतील. सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते. जंगलातील प्राणीही सापापासून लांब राहतात. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. शाकाहारी समजल्या जाणाऱ्या हरणाला भूक लागल्यावर त्याने सापाला कच्चं चावून खाल्लं. हे पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हरणानं चक्क ५ फूट जिवंत सापालाच खाल्लं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पण या हरणाला भूक लागल्याने त्याने खरंच चक्क जीवंत साप खाल्ला आहे. वन्य प्राण्यांमध्ये हरीण, हत्ती आणि झेब्रा शाकाहारी प्राणी मानले जातात, जे सहसा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून असतात. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, भूक लागल्या प्राणी काहीह खाऊ शकतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: देशी दारु अशी चढली की, स्वत:ला थेट ‘सुपरमॅन’ समजू लागला, पठ्ठ्यानं विजेच्या खांबावर घेतली झोप
फॉरेस्ट ऑफिसर @susantananda यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. वापरकर्ते हरणाला मांस खाताना पाहून आश्चर्यचकित झाले आहेत, कारण त्यांनी कधीही हरणाला मांस खाताना पाहिलं नाही.