Viral video: नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहाण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात. नवरा बायकोचे नाते म्हणजे उन सावलीचा खेळ. कधी रुसवा कधी फुगवा तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दात व्यक्त करता येतेच असे नाही. नवराब-बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दुख:तही सारखेच भागीदार होतात तेव्हा ते नात आणखी टिकतं. माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. अशाच एका संघर्ष करणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासारखंच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करत आहे. काही वेळ नवरा ट्रक चालवत आहे तर काहीवेळ बायको. तिचा संघर्ष पाहून प्रत्येकाला तिची दया येईल. या व्हिडीओतून संघर्षाचा आवाज किती मोठा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर कष्ट करावेच लागतात. नवरा बायको यांच्यातील प्रेमाचा असाच एक हृदयस्पर्षी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवऱ्याच्या संघर्षाच्या काळात खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ zindagi.gulzar.hया इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत. एका यूजरने लिहिले की, “आयुष्याला इथेही साथ हवी…” दुसऱ्या यूजरने लिहिले, “जर प्रेम खरे असेल तर एक व्यक्ती तुम्हाला मरेपर्यंत साथ देऊ शकते.” “खरा जीवनसाथी मिळणे खूप महत्वाचे आहे.”हरलेला डाव पण जिंकता येतो फक्त साथीदार कट्टर पाहिजे””