नवरा-बायकोमधील नात्यात प्रेमाबरोबर एकमेकांविषयी आदर असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळेच प्रेमाची ताकद वाढते आणि संसार सुखाचा होतो. पण, जर तुमचा जोडीदार तुमचा आदर करीत नसेल आणि तुम्हाला वाईट वागणूक देत असेल, तर त्यापेक्षा चुकीचं आणि वाईट काहीच नाही, असे म्हणावे लागेल.

सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी नवरा-बायकोच्या अनोख्या नात्यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ अगदी आनंद देणारे, तर काही आपल्याला थक्कच करून सोडणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात भररस्त्यात नवरा बायकोबरोबर गैरवर्तन करीत असल्याचे, तिला त्रास देत असल्याचे दिसते.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हेही वाचा… जीवाशी कसला खेळ करताय? थंडीपासून वाचण्यासाठी तरुणाने केला भयंकर जुगाड, आगीचा टोप बेडमध्ये ठेवला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO

नवऱ्याचा छळ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक जोडपे बाईकवरून इच्छित स्थळी जात आहे. नवरा बाईक चालवतोय आणि त्याच्या मागे बायको बसली आहे. बाईकवरून जात असताना अचानक त्याचा तोल जातो आणि बाईकसकट नवरा-बायको खाली कोसळतात. खाली पडल्यानंतर दोघेही थोडेसे जखमी होतात. पण या सगळ्याचा राग नवरा बायकोवर काढतो आणि खाली पडलेल्या बायकोला मदत करण्याऐवजी किंवा तिला उचलण्याऐवजी तो तिलाच मारतो. तिचे केस जोरात ओढतो आणि त्या अपघाती परिस्थितीतही तिला हिंसकपणे वागून त्रास देतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @viralinmaharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “शक्ल से सुंदर दिखने वाला नहीं, बल्कि दिल से सुंदर दिखने वाला लाईफ पार्टनर बनाओं” (सुंदर दिसणारा नाही, तर मनाने सुंदर असणारा जोडीदार निवडा) असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर मिल व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… अशी सायकल तुम्ही कधीच चालवली नसेल! दोघं एकत्र पेडलवर उभे राहिले अन्…, चिमुकल्यांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “स्त्रिया अशी वागणूक कशी सहन करतात?” दुसऱ्याने, “मला व्हिडीओमध्ये कोणताच माणूस दिसत नाही; मला फक्त प्राणी दिसतोय,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “या अशा माणसांमुळे महिलांनी नेहमीच स्वसंरक्षण शिकले पाहिजे.” तर, “नवरा म्हणून अपयशी ठरला”, अशीदेखील कमेंट एकाने केली.

Story img Loader