Viral video: गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात. विवाह हा विश्वास आणि प्रेम यावर आधार नातं आहे. यातील विश्वासच गेला तर त्या नात्याला अर्थ उरत नाही. अशावेळी प्रेमात फसवणूक करणाऱ्या जोडीदाराला शिक्षा करण्यासाठी काही वेळा कोण काय करेल काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे, यामध्ये एका महिलेला नवऱ्यानं तिच्या प्रियकराोबत रंगेहात पकडल्यानंतर काय केलंय पाहा. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र यावेळी नवऱ्यानं जे केलं ते बरोबर केलं का हे तुम्हीच व्हिडीओ पाहून सांगा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवऱ्यानं बायकोला रंगेहात पकडल्यानंतर त्यानं कोणत्याही प्रकारे तिच्यासोबत हिंसा किंवा तिला मारहाण न करता तिच्या गळ्यातंल मंगळसुत्र काढून घेतलं आणि तिच्या भांगेतलं कूंकू धुतलं. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली असून नवऱ्याच्या या कृतीवर थक्क झाले. नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून जातो. कदाचीत या नवऱ्यासोबतही असंच झालं असावं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “काय करायचं अशा महिलांचं, त्या नवऱ्यावर काय वेळ आली यामुळे?” तर आणखी एकानं, “लाजिरवाणं” अशी प्रतिक्रिया दिली आहे.