Crime News : उत्तर प्रदेशमध्ये हरवलेली पत्नी शोधणाऱ्या एका व्यक्तीला चांगलाच धक्का बसला. त्याची पत्नी त्याच्या चार मुलांसह घरातून अचानक बेपत्ता झाली.त्यानंतर हा व्यक्ती तिचा सर्वत्र शोध घेत राहिला अखेर कंटाळून त्यांने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. या ४० वर्षीय व्यक्तीने त्याची पत्नी हरवल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. त्यानंतर पोलिस देखील त्याच्या पत्नीचा शोध घेऊ लागले. मात्र त्याची ही हरवलेली पत्नी व्हॉट्सअॅपवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसून आली आणि त्याला मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, शकिर असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये त्याची पत्नी अंजुम ही १३ एप्रिलपासून बेपत्ता झाल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेशमधील रोरावारचे एसएचओ शिव शंकर गुप्ता यांनी सांगितले की शाकीरने १८ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती आणि ज्यामध्ये त्याने त्याची पत्नी गूढपणे गायब झाल्याचा आरोप केला होता.

शकिर हा एका कुटुंबातील लग्नासाठी बाहेर गेला होता आणि जेव्हा तो १५ एप्रिल रोजी परतला तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते आणि त्याची पत्नी आणि चार मुले गायब होती, असे तक्रारीत म्हटले आहे.

शेजार्‍यांनी त्याला सांगितले कोणी रोखण्याचा प्रयत्न करण्याच्या आधीच त्याची पत्नी सर्व मौल्यवान वस्तू घेऊन निघून गेली आहे. काही दिवस तिचा शोध घेतल्यानंतर, शकिरने पोलिसांशी संपर्क साधला.

नंतर शकिरच्या नातेवाईकाने अंजुमला तिने व्हॉट्सअॅपवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले. या व्हिडिओमध्ये ती ताजमहालमध्ये एका अज्ञात व्यक्तीबरोबर फिरताना दिसत होती. हा व्यक्ती शकिर काम करत होता त्या भागातील असल्याचे त्याने ओळखले. पत्नीला सगळीकडे शोधत असताना ती दुसर्‍याच एका व्यक्तीबरोबर ताजमहाल परिसरात फिरताना दिसून आल्याने ती हरवली नसून ती पळून गेल्याचे त्याच्या लक्षात आले.

“अंजुम आणि त्या व्यक्तीमध्ये नातेसंबंध निर्माण झाले आणि शकिरच्या अनुपस्थितीत तिने पळून जाण्याचा निर्णय घेतला असे दिसून येते,” असे गुप्ता म्हणाले. जिल्हा पोलिसांनी आग्रा पोलिसांना द्दल माहिती दिली आणि ते या जोडप्याचा शोध घेत आहेत