Husband Kills Wife In Crowded Market Video Viral : पंजाबच्या संगरूरमध्ये पुन्हा एकदा महिलेवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. एका व्यत्तीने त्याच्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने वार करून भरदिवसा तिचा खून केला. संगरुर जिल्ह्यात ही थरारक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगरूरच्या सुनम मार्केटमध्ये लोकांच्या गर्दीत या नराधमाने त्याच्या पत्नीवर वार केले. रिपोर्टनुसार, पत्तीचा खून केल्यानंतर त्या व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या करण्य्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये घटस्फोटाचा खटला सुरु होता. परंतु, या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आणि सुनम मार्केटमध्ये पतनी पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. या बाजारात लोकांच्या गर्दीतच या व्यक्तीने पत्नीला संपवलं. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने विष पिऊन स्वत:चं जीवनही संपवण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात येत आहे.
इथे पाहा बायकोचा खून केल्या नवऱ्याचा धक्कादायक व्हिडीओ
या भयानक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, पत्नीचा खून केलेला व्यक्ती हाता कुऱ्हाड घेऊन भर बाजारात उभा असल्याचं दिसत आहे. त्या व्यक्तीच्या बाजूला लोकांची गर्दी जमल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. लोकांनी त्या व्यक्तीला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली आणि पाण्याच्या फवाऱ्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान तो व्यक्ती लोकांनाही धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.