Couples Race Coemption Viral Video : जगभरात धावण्याच्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांचे नियमही खूप वेगळे असतात. काही स्पर्धा एखादं उद्दिष्ट घेऊन सुरु केल्या जातात. तर काही स्पर्धांचे आयोजन फक्त लोकांचं मनोरंजन करण्यासाठी केलं जातं. अशा स्पर्धांचं कोणत्याही प्रकारचं ध्येय नसतं. अशाचा एका स्पर्धेचं आयोजन फिनलॅंड देशात करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पती त्याच्या पत्नीला पाठीवर घेऊन रस्त्यावर धावत असतो. या स्पर्धेत जिंकणाऱ्या कपलला खास बक्षिसंही देण्यात येतं. या बक्षिसबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
गतवर्षी जुलै महिन्यात फिनलॅंडमध्ये वर्ल्ड वाइफ कॅरिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. फिनलॅंडच्या सोनकाजार्वी कस्बा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचं बोललं जात आहे. या स्पर्धेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हजारो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मेट्रो वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, फिनलॅंडच्या सोनकाजार्वी कस्बा येथे गेल्या वर्षी जुलै महिन्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नवरा बायकोला पाठीवर घेऊन रेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. १९९२ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली, असंही म्हटलं जात आहे.
नक्की वाचा – Video: सासरी जाताच नवरीने पहिला रील बनवला, वऱ्हाड्यांसमोरच ‘पतली कमरीया’वर थिरकली अन्…
इथे पाह व्हिडीओ
या स्पर्धेसाठी पतीचं वय १७ वर्षांपासून अधिक असलं पाहिजे. तसंच वजन कमीत कमी ४९ किलो असलं पाहिजे. जर पत्नीचं वजन कमी असेल, तर तिच्या पाठीवर वजन बांधण्यात येतं. या भन्नाट स्पर्धेचं बक्षिसही वेगळं आहे. नवऱ्याने स्पर्धा जिंकल्यावर बायकोच्या वजनाएवढी बिअरची बाटली बक्षिस म्हणून देण्यात येते, असं बोललं जात आहे. ही स्पर्धा फक्त फिनलॅंडमध्येच होत नाही, तर ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, अमेरिका, जर्मनीसारख्या अन्य देशांमध्ये लोकप्रिय आहे. या स्पर्धेचा व्हिडीओ इनसायडर इंटरनॅशनल नावाच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.