Viral video: आयुष्यात योग्य जोडीदार मिळणं आणि त्यानं नेहमी साथ निभावणं हे नक्कीच आव्हानात्मक असतं. प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं, असं वाटत असतं. सुख-दुःखं तर येतातच; मात्र ती झेलताना आपल्याला योग्य जोडीदार लाभला असेल, तर जास्त त्रास होत नाही. मात्र, जोडीदाराची निवड चुकली, तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. नात्याचा आदर करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जो जोडीदार निवडत आहात, तो वा ती दोघांतील नात्याचा आदर करीत नसेल, तर सर्व व्यर्थ आहे. तुम्ही आणि तुमच्या कामाला समजून घेऊन योग्य आदर देणारी व्यक्तीच तुमची योग्य जोडीदार होऊ शकते. जर तुम्हाला योग्य आदर न देता, केवळ गृहीत धरणारी व्यक्ती असेल, तर संसार कधीच सुखाचा होऊ शकत नाही अथवा नातं टिकू शकत नाही.

तुम्ही नेहमी अशा अनेक महिलांना तक्रार करतांना ऐकले असेल की त्यांचे पती स्वभावाने खूप चांगले आहेत पण त्यांना घरातील कोणत्याही कामात मदत करत नाहीत. ज्यामुळे त्यांना सतत थकवा जाणवतो. दरम्यान सध्या समोर आलेला व्हिडीओ हा याच्या अगदी उलट आहे. कारण या नवऱ्यानं आपल्या बायकोला स्वयंपाकात केलेल्या मदतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

आतापर्यंत तुम्ही नवऱ्याला वेगवेगळ्या कामात बायकोला मदत करताना पाहिलं असेल पण कधी नवऱ्याला भाकरी करताना पाहिलंय का? हो या तरुणानं चक्क बायकोला स्वंयपाकात मदत करताना भाकऱ्या केल्या आहेत. एखाद्या महिलेलाही जमणार नाही अशी भाकरी या तरुणानं केली आहे. एवढंच नाहीतर भाकरी फुगली सुद्धा आहे, भाकरी फुगल्यानंतर नवराही खूप खुश झाल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “संघर्षात साथ देणारी पोरगी पाहिजे” २०१४ ला नाशिक ते २०२४ ला थेट पॅरीस; दिवस कसे बदलतात पाहा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ missmatch_couple नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “भाकरी फुगली याचा किती आनंद झालाय दादा तुला खूप छान” तर आणखी एकानं “नशीबवान आहे यार तुझी बायको” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader