Viral News: बहुतांश घरांमध्ये भाज्या आणि किराणाचे सामान सहसा महिलाच आणतात. कारण घरात काय आणायचे आणि किती प्रमाणात आणायचे आणि कसे आणायचे याची समज त्यांना पुरुषांपेक्षा जास्त असते. कित्येक घरांमध्ये भाज्या आणि किराणाचे सामान आणण्यासाठी सर्वात पहिले एक यादी तयार केली जाते. मग ही यादी महिला आपल्या नवऱ्याला देतात, जेणेकरून त्यानुसार ते सर्व सामान घेऊन येतील. यादी देऊनही कित्येकदा पुरुष व्यवस्थित भाजी आणि किराणा सामान आणू शकत नाही, तेव्हा महिलांची प्रचंड चिडचिड होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या सोशल मीडियावर एका हटके सामानाच्या यादीचा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. यादीमध्ये भाज्या आणि किराणा सामान किती प्रमाणात आणायचे आहे याबाबत माहिती दिली आहे. या यादीमध्ये पत्नीने कोणती वस्तू, किती प्रमाणात, कोणत्या रंगाची आणि कोणत्या आकाराची असावी अशी सविस्तर माहिती दिली आहे, जेणेकरून तिच्या नवऱ्याला खरेदी करताना कोणताही त्रास होणार नाही आणि तो बाजारातून योग्य वस्तू घेऊन येईल.

हेही वाचा – ”प्राथमिक शिक्षक होणे सोपे नाही…” विद्यार्थ्यांबरोबर कसा जातो शिक्षकांचा एक दिवस? व्हायरल व्हिडीओ पाहाच!

पत्नीने भाज्यांची काढली चित्रं
तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल की, ‘यादीमध्ये कांदा, मिरची, पालक, बटाटा इ. वस्तूंचे चित्रदेखील काढले आहे. बटाटा कसा पाहिजे, टोमॅटो कसे पाहिजे, पालक कसा पाहिजे आणि मिरची कशी पाहिजे या सर्वांची सूचना देऊन पत्नीने त्या बाजूला चित्र काढले आहे.

हेही वाचा – विचित्रच आहे हे कुटुंब! दिसते माणसांसारखे, पण चालते प्राण्यांसारखे; त्यांना पाहून संशोधकही चक्रावले

इंटरनेटवर हा फोटो व्हायरल होत आहे. लोक अशी यादी तयार करणाऱ्या पत्नीचे कौतुक करत आहेत. एकाने सांगितले की, ”ती स्त्री आहे, ती काहीही लिहू शकते.” तर दुसऱ्याने लिहिले, ”माहितीपूर्ण पोस्ट”, तर तिसऱ्याने लिहिले की, ”पुरुषांना हे शिकवणेदेखील एक संघर्ष आहे.”