आजकाल कोणत्याही वयात कोणताही गंभीर आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे. अशात वेगवेगळ्या पदार्थांपासून अंतर राखण्याचा किंवा त्यांचे सेवन पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल जातो. या पदार्थांमध्ये दारू ही पहिल्या स्थानावर असते. अतिप्रमाणात मद्यपान केल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मात्र, डॉक्टरांनीच आपल्याला मद्यपान करण्याचा सल्ला दिल तर?
आपण आपल्या आयुष्यात अशा एका तरी व्यक्तीला भेटलो असू जो म्हणतो की दारू ही अनेक समस्यांचे समाधान आहे. असाच काहीसा प्रत्यय केरळमधील एक महिलेला आला आहे. केरळमधील त्रिशूर येथील दया रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक डॉक्टरने महिला रुग्णाला, तिच्या पायात होणाऱ्या वेदनेसाठी ‘नवऱ्याने बारला भेट’ द्यावी असे लिहून दिले आहे. दरम्यान, या डॉक्टरला आता निलंबित करण्यात आले आहे.
Work From Pub : ना घर, ना ऑफिस… आता थेट पबमधून करा काम! हॉटेल मालकांची कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर
४४ वर्षीय प्रिया आणि तिचे पती अनिल कुमार यांनी गुरुवारी दया रुग्णालयातील डॉ. रॉय वर्गीस यांची भेट घेतली. प्रियाच्या पायाच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी हे जोडपे रुग्णालयात आले होते. यावेळी डॉक्टरांनी तिला पायाचा एक्स-रे काढण्यास सांगितले. एक्स-रे पाहिल्यानंतर डॉक्टर रॉय यांनी प्रियाला दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेण्याचे सुचवले. दरम्यान, या जोडप्याने प्रियाला होणाऱ्या वेदना थांबण्यासाठी काही तात्पुरती औषधे देण्याची विनंती डॉक्टरांकडे केली. मात्र, डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला.
या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहले होते, “बेड रेस्ट घेण्याची गरज नाही. काहीही समस्या असल्यास पतीने बारला भेट द्यावी.” हे वाचल्यानंतर अनिलला प्रचंड राग आला. डॉक्टरांनी केलेल्या या अपमानची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे अनिलने यावेळी सांगितले.
अबब! तब्बल ६२ लाखांना विकली गेली ही जुनी जीन्स; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सचा सोशल मीडियावर पूर
दरम्यान, रुग्णाकडून यासंबंधी कोणतीही तक्रार आली नसल्याचे दया रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने स्थानिक माध्यमांना सांगितले. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित डॉक्टरकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले. दया रुग्णालयातील एक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरने दिलेले स्पष्टीकरण असमाधानकरक असल्याने, त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशीही केली जाणार आहे.